शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनने दिला दगा; आता शेतकऱ्यांची कापसावरच भिस्त !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 13:37 IST

Chandrapur : खासगी बाजारपेठेत मिळतोय तोकडा दर

प्रकाश काळे लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : खरीप हंगामात सोयाबीनचे उत्पादन कमी झाले. त्या तुलनेत सोयाबीनचे दर वाढणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही. त्यामुळे सोयाबीन शेतकऱ्यांना परवडले नाही. आता शेतकऱ्यांचे पांढरे सोने समजले जाणाऱ्या कापसाला तोकडा दर मिळत असल्याने कापसाची दरवाढ व्हावी अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

दरवर्षी प्रमाणे यंदाही शेतकऱ्यांनी सोयाबीनची मोठ्या प्रमाणात लागवड केली. मात्र अपेक्षेप्रमाणे सोयाबीनचे उत्पादन झाले नाही. उलट खासगी बाजारपेठेत सोयाबीनला चार हजार रुपयांपर्यंत अल्प दर मिळाल्याने सोयाबीनचे पीक शेतकऱ्यांना परवडले नाही. सोयाबीन सोबतच शेतकरी खरीप हंगामात शेतकऱ्यांचे नगदी पीक म्हणून कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड करतात. मात्र दिवसेंदिवस शेतकऱ्यांचे पांढरे सोने समजले जाणाऱ्या कापसाला तोकडा दर मिळत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. कापसाच्या उत्पादनापेक्षा खर्च अधिक असल्याने शेतकऱ्यांना सात हजार रुपये एवढ्या अल्प दरात कापूस विकणे परवडत नाही.

कृषी प्रधान देशातील शेतकऱ्यांची आज वाईट अवस्था झाली आहे. एकीकडे निसर्गाची अवकृपा तर दुसरीकडे शासनाचे शेतकरी विरोधी धोरण यामुळे शेतीला दिवसेंदिवस अवकळा आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा, कोरपना, जिवती हे तालुके कापसाच्या उत्पादनात अग्रेसर मानले जातात. मात्र दिवसेंदिवस कापसाला तोकडा दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचे पांढरे सोने आता नावालाच असल्याची भीती शेतकऱ्यांना आहे. खासगी बाजारपेठेत कापसाला सात हजार रुपये तोकडा दर मिळत असल्याने या कापसाच्या दरात शेतकऱ्यांनी कापसावर केलेला उत्पादन खर्च भरून निघत नाही. त्याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसतो. मात्र शासन शेतकऱ्यांच्या या ज्वलंत प्रश्नांवर तोडगा काढायला तयार नाही. त्यामुळे शेतकरी दिवसेंदिवस कर्जबाजारी होत आहे. उत्पादनापेक्षा खर्च महाग झाल्याने शेतकऱ्यांना कमी किमतीत कापूस विकायला परवडत नाही. परंतु नाईलाजाने शेतकऱ्यांना सात हजार एवढ्या कवडीमोल भावात कापूस खाजगी व्यापाऱ्यांना विकावा लागत आहे. मात्र याकडे अजूनही शासनाने लक्ष देऊ नये हे एक कोडेच आहे.

"शेतकरी दरवर्षी कापसावर मोठ्या प्रमाणात खर्च करतात. मात्र खासगी बाजारपेठेत कापसाला सात हजार रुपये एवढा तोकडा दर मिळत असल्याने कापूस कमी दरात विकणे शेतकऱ्यांना परवडत नाही. त्यामुळे शासनाने कापसाच्या दरात वाढ करावी." - श्रीधर जुनघरी, कापूस उत्पादक शेतकरी, गोवरी

"कापूस पिकांवर शेतकरी मोठ्या प्रमाणात खर्च करतात. मात्र खासगी बाजारपेठेत कापसाला तोकडा दर असल्याने कमी भावात कापूस विकणे शेतकऱ्यांना परवडत नाही. कापूस वेचणीचे दर वाढल्याने कापसाची दरवाढ होणे अपेक्षित आहे." - चेतन बोभाटे, युवा शेतकरी

कापूस वेचणीची मजुरी महागली कापूस तोकड्या दरात शेतकऱ्यांना विकावा लागत असला तरी ८ ते ९ रुपये किलोप्रमाणे बाहेरील मजूर आणून कापूस वेचणी करावी लागत आहे. सध्या सर्वांकडे कापूस वेचणीची लगबग सुरू झाली असून शेतकऱ्यांना कापूस वेचणी करण्यासाठी मजुरांच्या शोधत फिरावे लागत आहे. वेचणीचा खर्च महाग झाल्याने तसेच कापसाला बाजारपेठेत चांगला दर नसल्याने कापूस पीक शेतकऱ्यांना परवडत नाही. अशी बिकट अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. 

टॅग्स :cottonकापूसfarmingशेतीSoybeanसोयाबीनAgriculture Sectorशेती क्षेत्र