शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णवाहिकेत उरकला शुभविवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 00:25 IST

रात्री तिच्या अंगाला हळद लागली. दुसऱ्याच दिवशी तिचा विवाह होणार असल्याने ती भावी आयुष्यातील सोनेरी स्वप्न रंगवू लागली. घरी आनंदाचे वातारण असताना पहाटेच्या सुमारास अचानक तिची तब्येत बिघडली आणि तिला चंद्रपूरच्या खासगी दवाखान्यात हलवावे लागले.

ठळक मुद्देनववधू आजारी : चिंतलधाबा येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : रात्री तिच्या अंगाला हळद लागली. दुसऱ्याच दिवशी तिचा विवाह होणार असल्याने ती भावी आयुष्यातील सोनेरी स्वप्न रंगवू लागली. घरी आनंदाचे वातारण असताना पहाटेच्या सुमारास अचानक तिची तब्येत बिघडली आणि तिला चंद्रपूरच्या खासगी दवाखान्यात हलवावे लागले. तिथूनही तिला नागपूरला घेऊन जाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. मात्र नियोजित लग्नासाठी वऱ्हाडी विवाहस्थळी हजर झाले. त्यामुळे अखेर नववधूला सलाईन लावूनच रुग्णवाहिकेने विवाहस्थळी आणून तिथेच विवाह उरकला.पोंभूर्ण्यापासून सात किमी. अंतरावर असलेल्या चिंतलधाबा येथील भुजंगराव सोयाम यांची मुलगी वैशाली हिचा विवाह गोंडपिपरी तालुक्यातील वढोली येथील सेवानिवृत्त शिक्षक दलपतराव आत्राम यांचा मुलगा गणेश यांच्याशी ९ मे रोजी होणार होता. मात्र आदल्या रात्री नववधू वैशालीची प्रकृती खालावली आणि तिला चंद्रपूरच्या खासगी रूग्णालयात भरती करण्यात आले. नववधूची प्रकृती खालावल्याचा निरोप वर पक्षाकडील मंडळींनाही देण्यात आला. मात्र वर पक्षाकडील मंडळीना भलत्याच शंकेने घेरल्यामुळे त्यांनी नियोजित वेळेवरच विवाह झाला पाहिजे, अशी भूमिका घेतली.नवरदेवाची वरात चिंतलधाब्यात दाखल झाली होती. दुसरीकडे नववधू वैशालीला डॉक्टरांनी नागपूर येथे हलविण्याचा सल्ला दिला. वैशालीला घेऊन रुग्णवाहिका वरोऱ्यापर्यंत पोहचलीही. मात्र तिथून तिला रूग्णवाहिकेसह परत बोलाविण्याचा निर्णय घेण्यात आला. रूग्णवाहिका वैशालीला घेऊन थेट लग्न मंडपात दाखल झाली. नवरी सलाईनसह रूग्णवाहिकेत व नवरदेव रूग्णवाहिकेच्या बाजुला उभा करून शेकडो वऱ्हाड्यांच्या उपस्थितीत मंगलाष्टकांसह हा अनोखा विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्याची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा होती.

टॅग्स :marriageलग्न