शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
2
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
3
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
4
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
6
यशस्वी जैस्वालने पुन्हा घातला घोळ! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
7
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
8
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक
9
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
10
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
11
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
12
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
13
डॅशिंग 'शिवा' खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड; पूर्वा कौशिकचं नवं फोटोशूट पाहिलंत का?
14
Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल
15
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
16
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
17
दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...
18
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
19
अपघाताच्या एक दिवस आधी एअर इंडियाच्या सीईओंचा पगार ४६% वाढवला; आता किती पैसे मिळतात?
20
विहिरीत पडलेल्या वासराला वाचवण्यासाठी उतरलेले तरुण एका पाठोपाठ एक बेशुद्ध पडले, पाच जणांचा मृत्यू, संपूर्ण गावावर शोककळा  

लाभार्थ्यांचे साहित्य गोडाऊनमध्ये !

By admin | Updated: November 4, 2016 01:15 IST

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गोरगरीब जनतेसाठी अनेक योजना राबविल्या जातात. या योजना चंद्रपूरच्या जिल्हा परिषदेनेही राबविल्या.

पुरवठाच केला नाही : साहित्यांची दुर्दशा; प्रोटीन्स उंदरांनी खाल्लेचंद्रपूर : जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गोरगरीब जनतेसाठी अनेक योजना राबविल्या जातात. या योजना चंद्रपूरच्या जिल्हा परिषदेनेही राबविल्या. मात्र अनेक योजनेतील लाभ प्रत्यक्षात लाभार्थ्यांना मिळालाच नाही. अशाच एका योजनेतील बैलबंडीचे प्रकरण या मिनी मंत्रालयात चांगलेच गाजले. आता पुन्हा नवा प्रकार समोर आला आहे. गरोदर माता, स्तनदा माता, कुमारिका, बालके यांच्यासाठी महिला व बाल कल्याण विभागामार्फत लाखो रुपयांचे साहित्य साहित्य, औषधी शासनस्तरावरून पुरविण्यात आले. मात्र जिल्हा परिषदेने त्याचा लाभार्र्थ्यांना पुरवठाच केला नाही. हे साहित्य पंचायत समितीच्या गोडावूनमध्ये धूळखात पडले आहे.स्तनता माता, गरोदर माता, बालके यांचे आरोग्य सुदृढ रहावे, जिल्हा कुपोषणमुक्त व्हावा, याशिवाय कुमारिका शिक्षणाच्या प्रवाहात याव्या, यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागामार्फत प्रोटीन पावडर, सायकल, शिलाई मशीन आदी साहित्यांचे लाभार्थ्यांना वाटप केले जाते. हे लाखो रुपयांचे साहित्य शासनाकडून जिल्हा परिषदेकडे अनेक महिन्यांपूर्वीच आले. या साहित्यांचा लाभार्थ्यांपर्यंत ुपुरवठा व्हायला हवा होता. तेव्हाच शासनाच्या योजनेची फलश्रुती झाली असती. मात्र तसे झाले नाही. सत्ताधारी पदाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे हे साहित्य पंचायत समिती स्तरावर धूळखात पडले आहे. जिल्हा परिषदेतील काँग्रेसचे गटनेते व विद्यमान सदस्य सतीश वारजूकर यांनी सिंदेवाही पंचायत समितीच्या गोडावूनची पाहणी केली असता गोडावूनमध्ये अनेक साहित्य धूळ खात पडलेले असल्याचे निदर्शनास आले. त्यामध्ये सायकल, शिलाई मशिन, सौर दिवे, प्रोटीन पावडर आदी साहित्यांचा समावेश होता. प्रोटीन पॉवडर तर अक्षरश: कचऱ्याच्या ढिगाऱ्यात पडलेले आहेत. एकीकडे २०१६-१७ या आर्थिक सत्रासाठी साहित्य खरेदीकरिता जिल्हा परिषदेची लगबग सुरु आहे. दुसरीकडे मिळालेले साहित्यच अद्याप लाभार्थ्यांपर्यंत पोहचले नाही. जर साहित्य गोरगरिबांपर्यंत पोहोचत नसतील तर पदाधिकारी म्हणून मिरविण्यात काय अर्थ आहे, असे वारजूकर यांनी म्हटले आहे. मागील सत्रातील साहित्य धूळ खात पडलेले असतानाही ते सत्ताधाऱ्यांना दिसू नये, याबाबत संताप व्यक्त केला जात आहे. कुपोषित बालकांना कृपोषणापासून वाचविण्यासाठी पुरवठा करण्यात आलेले प्रोटीन पावडर उंदराने खाऊन टाकले आहे. लाखो रुपयांचे प्रोटीन पावडरचे बॉक्स पाण्याने खराब झालेले आहे. जमिनीवर गोडावूनभर उंदराने खालेले पॉकेट पडलेले आहे. असे असतानाही पदाधिकारी मात्र सुस्त आहेत. (शहर प्रतिनिधी)सभापतींनी राजीनामा द्यावासिंदेवाही तालुक्यातील पंचायत समिती गोडाऊनला भेट दिली असता तिथे शिलाई मशिन, सोलर लाईट, सायकल, प्रोटीन पावडर इत्यादी वस्तू धूळ खात पडलेले दिसून आले. गरीब जनतेच्या योजना गरिबांपर्यंत पोहचविण्यात सत्ताधारी पदाधिकारी असक्षम झालेले आहेत. मात्र यातून गरीब लाभार्थ्यांवर अन्याय होत आहे. त्यामुळे महिला व बाल कल्याण सभापतींनी राजीनामा द्यावा, अशी मागणी गटनेते सतीश वारजूकर यांनी केली आहे.