शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यार्थ्यांना शारीरिक अन् मानसिक शिक्षा देण्यावर बंदी; शिक्षण विभागाने जारी केली नवी नियमावली
2
BMC निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या महिला नेत्याचा भाजपात प्रवेश होणार
3
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
4
Crime: आधी पाच मुलांना गळफास लावला, नंतर बापानेही संपवले आयुष्य; दोन मुले वाचली
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य,१५ डिसेंबर २०२५: नशिबाची मिळणार साथ, आज सर्वत्र लाभच लाभ 
6
२ गोळ्या झेलूनही दहशतवाद्याकडून हिसकावली बंदूक; अखेर कोण आहे सिडनीतील हा 'Brave Man'?
7
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
8
बापरे! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला सोसायटीतील व्यक्तीकडून मारहाण, डोक्याला गंभीर दुखापत
9
दोन वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या महाराष्ट्रातील आरोपीला फाशीच, राष्ट्रपतींनी फेटाळली याचिका
10
लोकलच्या फुटबोर्डावर उभे राहणे निष्काळजीपणा नव्हे, तर..; कोर्टानेच कान टोचले... आतातरी शहाणे व्हा!
11
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
12
कोट्यवधी रुपयांची अफरातफर; भ्रष्टाचार केला म्हणून चीनच्या बँकरला मृत्युदंड
13
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
14
बाइक टॅक्सीचालकाचा तरुणीवर अतिप्रसंग; धैर्याने प्रतिकार करीत गाठले पोलिस ठाणे
15
संपादकीय : महायुतीचा नवा बूस्टर..! नागपूर अधिवेशनात चर्चा, मुनगंटीवारांची सभागृहात तुफान टोलेबाजी
16
नवी मुंबई विमानतळामुळे मुंबईत सकाळच्या वेळी येता येईल का? संध्याकाळी परत जाता येईल का?
17
नवी मुंबई विमानतळावर तिसरीही धावपट्टी! दीर्घकालीन हवाई वाहतुकीचा आढावा; सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू
18
गोवा अग्निकांड; अपघात नव्हे, अक्षम्य बेपर्वाई! २५ जणांच्या मृत्यूनंतर मालकांचे थायलंडमध्ये पलायन
19
कढीपत्ता फोडणीतच; बायका, मुलं, भाऊ मैदानात..! कार्यकर्त्यांची सतरंज्या उचलण्याची भूमिका कधी संपणार?
20
विमा क्षेत्रात १०० टक्के एफडीआय- सर्वांसाठीच बाधक! कोट्यवधी विमाधारकांची गुंतवणूक धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

प्रपत्र ‘ड’मध्ये समाविष्ट झाल्याने लाभार्थी घरकुलापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2022 05:00 IST

उश्राळ मेंढा ग्रामपंचायतीच्या पंतप्रधान आवास योजनेंतर्गतच्या प्रपत्र ‘ड’यादीमध्ये उश्राळमेंढा, गंगासागर हेटी, म्हसली, मिंडाळा या गावांतील घरकुल लाभार्थ्यांची नावे समाविष्ट झालेली आहेत. या कारणास्तव उश्राळ मेंढा गावातील लाभार्थ्यांचे घरकुलासाठी रजिस्ट्रेशन करताना अडचणी निर्माण होत आहेत. शिवाय त्यांना लाभ देता येणार नाही, असे संबंधित  विभागाकडूनही सांगण्यात आले आहे. त्यामुळे गाववासीय लाभार्थ्यांना घरकुलाच्या लाभापासून वंचित राहण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसावरगाव : नागभीड तालुक्यातील उश्राळमेंढा येथील ग्रामपंचायतअंतर्गत पंतप्रधान आवास योजनेच्या प्रपत्र ‘ड’मध्ये उश्राळ मेंढा, गंगासागर हेटी, म्हसली, मिंडाला या गावांतील घरकुल लाभार्थ्यांची नावे समाविष्ट झाल्याने उश्राळ मेंढा गावातील लाभार्थी घरकुलांच्या लाभापासून वंचित राहत असल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान, सदर गावांची नावे वगळून उश्राळमेंढा  येथील लाभार्थ्यांची घरकुले मंजूर करण्यात यावीत, अशी ग्रामपंचायतची मागणी असून, याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.उश्राळ मेंढा ग्रामपंचायतीच्या पंतप्रधान आवास योजनेंतर्गतच्या प्रपत्र ‘ड’यादीमध्ये उश्राळमेंढा, गंगासागर हेटी, म्हसली, मिंडाळा या गावांतील घरकुल लाभार्थ्यांची नावे समाविष्ट झालेली आहेत. या कारणास्तव उश्राळ मेंढा गावातील लाभार्थ्यांचे घरकुलासाठी रजिस्ट्रेशन करताना अडचणी निर्माण होत आहेत. शिवाय त्यांना लाभ देता येणार नाही, असे संबंधित  विभागाकडूनही सांगण्यात आले आहे. त्यामुळे गाववासीय लाभार्थ्यांना घरकुलाच्या लाभापासून वंचित राहण्याची वेळ येऊन ठेपली आहे. दरम्यान, या समस्येचा लवकरच निपटारा  होईल, असे वारंवार घरकुल विभागाकडून सांगण्यात येत आहे. मात्र, अजूनपर्यंत सदर प्रश्न सोडविण्यात आलेला नाही. मात्र,  इतर गावांना लक्षांक प्राप्त होऊन प्रपत्र ‘ड’ची घरकुले  बांधकामास सुरुवातही झालेली आहे आणि सदर गावातील लाभार्थी वंचित राहण्याची संभावना निर्माण झाली असून, लाभार्थी वारंवार ग्रामपंचायतीला घरकुलाबाबत विचारणा करीत आहेत. यासाठी संबंधित विभागाने उश्राळमेंढा ग्रामपंचायतीला अनवधानाने समाविष्ट झालेल्या गावांची नावे वगळून गावातील घरकुल लाभार्थ्यांना त्वरित लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी ग्रामपंचायतीने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी सरपंच हेमराज लांजेवार, रूपाली रत्नावार, जिल्हा परिषद  गटनेता डॅ. सतीश वारजूकर आदींची उपस्थिती होती.

 

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना