शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

लाडक्या बहिणींना तिसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा; नोंदणी करणाऱ्यांच्या संख्येत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2024 14:24 IST

जिल्ह्यात सहा लाखांवर नोंदणी : दोन महिन्यांचे मिळाले अनुदान

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : दोन महिन्यांचे अनुदान मिळाल्यानंतर 'लाडक्या बहिणीं'ना आता तिसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे. यापूर्वी १५ ते २८ ऑगस्टदरम्यान जिल्ह्यात तीन टप्प्यांत या अनुदानाचे वितरण झाले होते. सप्टेंबर महिना संपत येत असल्याने आता तिसऱ्या महिन्याच्या अनुदानाकडे लाडक्या बहिणींचे लक्ष लागले आहे. दरम्यान, जिल्ह्यात या योजनेसाठी नोंदणी करणाऱ्या महिलांची संख्या ४ लाखांवर पोहोचली आहे. 

राज्य शासनाने जून महिन्यात राज्यातील महिलांसाठी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना लागू केली आहे. या योजनेंतर्गत दरमहा पात्र महिलेला १ हजार ५०० रुपये अनुदान दिले जात आहे. या योजनेतील काही अटी कमी करीत, राज्य शासनाने ही योजना सुलभ करण्याचा प्रयत्न केला आहे. या योजनेसाठी नोंदणी करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. 

नोंदणी केलेल्या महिलांची संख्या ४ लाखांवर गेली आहे. यापैकी काही महिलांचे आधार सीडिंग झालेले नव्हते, त्यालाही गती देत बहुतांशी महिलांची बँक खाती आधारशी जोडली गेली असून, त्यांच्या खात्यात पैसे जमा होत आहेत. आता मात्र लाडक्या बहिणींना तिसऱ्या हप्त्याच्या अनुदानाची प्रतीक्षा लागली आहे. दरम्यान, आजही अनेक महिलांची अर्ज करण्यासाठी धावाधाव सुरु असल्याचे चित्र जिल्ह्यात सर्वत्र बघायला मिळत आहे.

सप्टेंबर अखेरपर्यंत नोंदणीसाठी मुदत या योजनेसाठी अर्ज करण्याकरिता ३० सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. यामुळे अजूनही या योजनेसाठी अर्ज दाखल होत आहेत. मुदतीत आलेल्या अर्जाची छाननी करून पात्र ठरणाऱ्या महिलांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे तीन महिन्यांचे अनुदान दिले जाणार आहे. 

"माझी लाडकी बहीण योजनेचे पहिल्या टप्प्यात तीन हजार रुपयांचे अनुदान जमा करण्यात आले आहे. त्यानंतर आता तिसऱ्या टप्प्यातील अनुदान जमा केले जाणार आहे. कोणतेही अर्ज प्रलंबित राहू नयेत यासाठी काळजी घेतली जात आहे. अधिकाधिक महिलांना याचा लाभ दिला जात आहे." - दीपक बानाईत महिला व बालकल्याण अधिकारी, चंद्रपूर

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर