शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

तिसऱ्या लाटेची घंटा वाजणार; कोरोनाविरुद्ध लढण्याची तयारी कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:20 IST

चंद्रपूर : कोरोनाबाधितांची संख्या घसरू लागल्याने नागरिक निश्चिंत होऊन दैनंदिन व्यवहारात गुंतले असतानाच आता नव्या चिंतेने भर टाकली. गत ...

चंद्रपूर : कोरोनाबाधितांची संख्या घसरू लागल्याने नागरिक निश्चिंत होऊन दैनंदिन व्यवहारात गुंतले असतानाच आता नव्या चिंतेने भर टाकली. गत दोन आठवड्यांपासून कोविड रुग्णांची संख्या दररोज १५ पेक्षा जास्त होऊ लागली. जिल्हा प्रशासनाने लागू केलेले निर्बंध कायम असतानाच रुग्णवाढ होत असल्याने दोन-तीन महिन्यात तिसरी लाट येण्याची चर्चा सुरू झाली. या पार्श्वभूमीवर प्रशासनाची तयारी कशी आहे, हा प्रश्नही आता ऐरणीवर आला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात कोविडबाधित मृतांच्या संख्येला ब्रेक लावण्यात प्रशासनाला यश आले. कोरोना प्रतिबंधक उपचार करण्यासाठी पायाभूत सुविधांचीही व्याप्ती वाढली. त्यामुळे नागरिकांनी भयभीत होण्याचे कारण नाही, असा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. राज्याच्या कोविड १९ टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रात तिसरी लाट येईल. ही लाट पहिल्यापेक्षा जास्त तीव्र असेल. पण, दुसऱ्या लाटेच्या तुलनेत गंभीर नसेल, असा इशारा माध्यमांमध्ये दिला आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेत बाधितांचे जीव वाचविणे आणि रुग्णालयात दाखल होण्याची परिस्थितीच येऊ नये. सौम्य अथवा लक्षणविरहित रुग्णांवर घरच्या घरी तसेच गंभीर रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल केल्यानंतर ऑक्सिजन बेड्स उपलब्ध करून देणे, याला प्राधान्य द्यावे लागणार आहे. मुख्य म्हणजे अधिकाधिक नागरिकांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण करून हर्ड इम्युनिटी निर्माण करण्यावर भर देणे गरजेचे आहे. त्यादृष्टीनेच जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या मार्गदर्शनात जिल्हा प्रशासनाकडून नियोजन व अंमलबजावणी केली जात आहे.

रुग्णसंख्या २० हजारपर्यंत जाण्याचा अंदाज

तिसऱ्या लाटेची सध्या तरी शक्यता नाही. मात्र, लाट आलीच तर रुग्णांची संख्या सुमारे २० हजारांपर्यंत जाण्याचा अंदाज गृहीत धरण्यात आला आहे.

त्यानुसार कोविड केअर सेंटरमध्ये ९ हजार रुग्ण राहू शकतात. २५०० ऑक्सिजन बेड्स, ८५० आयसीयू तर ४२५ व्हेंटिलेटर बेड्स लागू शकतात.

सीसीसीमध्ये ४ हजार रुग्ण ठेवण्याची क्षमता

सध्या जिल्ह्यातील कोविड केअर सेंटरमध्ये ४ हजार रुग्णांवर उपचार करण्याची क्षमता आहे. १ हजार ३०० ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेड्स १०५ आहेत. त्यातील ९४ व्हेंटिलेटर कार्यरत आहेत. जिल्ह्यातून ५० व्हेंटिलेटर आयुक्त ८० व्हेंटिलेटर वैद्यकीय शिक्षण विभागाकडून मागविण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला. यापैकी २४ व्हेंटिलेटर प्राप्त झाले आहेत.

५६.३४ मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध

शासनाने सूचविल्याप्रमाणे लिक्विड ऑक्सिजनची ५७ मेट्रिक टन गरज असून सध्या ५६.३४ मेट्रिक टन उपलब्ध आहे. पीएसए ऑक्सिजन १६ मेट्रिक टन हवा तो आता १५ मेट्रिक टन आहे. सिलिंडर ऑक्सिजन ८ मेट्रिक टन पाहिजे सध्या १० मेट्रिक टन उपलब्ध आहे. जम्बो केअर सेंटरमध्ये २०० बेड्स, पॉलिटेक्निकमध्ये २०० तर ग्रामीण रुग्णालयात ४७५ वाढीव बेड्स उपलब्ध होतील. मूल येथे ५० बेड्सची पाइपलाइन अंतिम टप्प्यात आहे.

लहान मुलांसाठीही केअर सेंटर

तिसऱ्या लाटेचा अंदाज गृहीत धरून लहान मुलांसाठीही केअर सेंटर्स सज्ज ठेवण्यात आले. म्युकरमायकोसिसचाही धोका वाढू नये, यासाठी हॉस्पिटल्समध्ये विशेष कक्ष तयार आहेत. तालुकास्थळ व नगरपंचायत स्तरावर ऑक्सिजन प्लांटसाठी नुकत्याच निविदा प्रकाशित करण्यात आल्या.