शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

नववर्षाच्या प्रारंभीच कामगारांचे साखळी उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 23:25 IST

जिल्हा सामान्य रुग्णालयात मागील ८ ते १० वर्षांपासून काम करणाºया १३७ कंत्राटी कामगारांना अचानक कामावरून काढण्यात आले.

ठळक मुद्देकामावर घ्या : रुग्णालय व्यवस्थापनाने केले कामावरून कमी

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : जिल्हा सामान्य रुग्णालयात मागील ८ ते १० वर्षांपासून काम करणाºया १३७ कंत्राटी कामगारांना अचानक कामावरून काढण्यात आले. रुग्णालय व्यवस्थापनाच्या या निर्णयाविरोधात प्रहारच्या नेतृत्वात या कंत्राटी कामगारांनी आंदोलनाचे रणशिंग फुंकले. ठिय्या आंदोलनानंतर या कामगारांनी नववर्षाच्या प्रारंभी उपोषणाचा मार्ग पत्करला आहे. सोमवारपासून जटपुरा गेटवर या कामगारांनी साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे.जिल्हा सामान्य रुग्णालयात अपंग प्रमाणपत्र, जन्म-मृत्यू नोंदणी, जननी शिशू सुरक्षा योजना, स्वयंपाकी, सुरक्षा रक्षक अशा विविध व संवेदनशील ठिकाणी काम करणाºया या कर्मचाºयांना अचानक कामावरून काढल्याने दवाखान्यातील अत्यावश्यक सेवा प्रभावित झालेल्या आहेत.दरम्यान, सोमवारी पहिल्या दिवशी श्वेता भालेराव, लता उईके, माया वांढरे, विश्रांती खोब्रागडे, कांचन चिंचेकर, किशोर रोहणकर, प्रफुल्ल बजाईत, विक्की दास, प्रमोद मंगरुळकर, सुशिला डोर्लीकर हे सकाळी १० वाजतापासून उपोषणाला बसले आहेत.यावेळी प्रहारचे जिल्हाध्यक्ष व नगरसेवक पप्पु देशमुख, मनिषा बोबडे, मिना कोंतमवार, घनश्याम येरगुडे, इमदाद शेख, हरिदास देवगडे, निलेश पाझारे, सतीश खोब्रागडे, प्रफुल्ल बैरम, अमुल रामटेके, गितेश शेंडे आदी उपस्थित होते.आंदोलन मागे घेणार नाहीजिल्हा सामान्य रुग्णालयात काम करणाऱ्या कंत्राटदाराच्या कंत्राटाची मुदत मागील मार्च २०१७ मध्ये संपली होती. त्यानंतर कंत्राटदारास मुदतवाढ देण्यात आली. मध्यंतरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मोरे यांनी नव्याने निविदा काढून २३६ कामगारांना कंत्राटी पध्दतीने कामावर घेतले. विशेष म्हणजे, जुन्याच कंत्राटदाराला नवीन काम देण्यात आले. मात्र आठ ते दहा वर्षांपासून काम करणाऱ्या जुन्या कंत्राटी कामगारांच्या समायोजनाचा विचार करण्यात आला नाही. जिल्हा सामान्य रुग्णालय हे आधी शासनाच्या आरोग्य विभागांतर्गत काम करीत होते. आता हे रूग्णालय मेडीकल कॉलेज म्हणजेच वैद्यकीय शिक्षण मंत्रालयांतर्गत अस्थायी स्वरूपात म्हणजे तीन वर्षांसाठी काम करणार आहे. सध्या या रूग्णालयातील स्थायी कर्मचारी- अधिकारी हे महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या निधीतून पगार घेतात व वैद्यकीय शिक्षण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या मेडीकल कॉलेजला सेवा देतात. अशाच प्रकारे जुन्या कंत्राटी कामगारांचे समायोजन करणे शक्य होते. परंतु शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन व सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या चुकीमुळे १३७ कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्या समायोजनाचा प्रश्न निकाली निघल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा प्रहारचे नगरसेवक पप्पू देशमुख यांनी यावेळी दिला.