शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
2
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
3
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
4
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
5
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
6
Dental Care: टार्टर आणि प्लाक दातांचे मुख्य शत्रू, करू शकतात गंभीर नुकसान; वेळीच घ्या 'ही' काळजी 
7
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
8
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
9
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
10
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
11
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
12
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
13
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
14
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
15
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
16
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
17
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
18
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
19
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
20
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?

स्वत:च तयार करू लागले स्वत:साठी अपारंपरिक इंधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2022 05:00 IST

पॉम स्टिरीन, वापरलेल्या भाजीपाला तेलांपासून आणि काही प्राण्यांच्या चरबीपासून हे इंधन तयार होते. वाहतूक व्यवसायामुळे पर्यावरणावर होणाऱ्या घातक परिणामांची जाणीव होतीच. शिवाय, इंधनावरील वारेमाप खर्च टाळण्यासाठी चंद्रपुरातील समाजसेवी उद्योजक राणा सिंग यांनी स्वतःचे इंधन स्वत:च तयार करण्याचे धाडस दाखविले. परिणामी, एका वाहनामागचा दररोजचा सुमारे १० ते १२ हजारांचा खर्चही वाचविण्यात त्यांना यश आले.

राजेश मडावीलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : बायोडिझेल हा जैवइंधनाचा दुसरा प्रकार आहे. पॉम स्टिरीन, वापरलेल्या भाजीपाला तेलांपासून आणि काही प्राण्यांच्या चरबीपासून हे इंधन तयार होते. वाहतूक व्यवसायामुळे पर्यावरणावर होणाऱ्या घातक परिणामांची जाणीव होतीच. शिवाय, इंधनावरील वारेमाप खर्च टाळण्यासाठी चंद्रपुरातील समाजसेवी उद्योजक राणा सिंग यांनी स्वतःचे इंधन स्वत:च तयार करण्याचे धाडस दाखविले. परिणामी, एका वाहनामागचा दररोजचा सुमारे १० ते १२ हजारांचा खर्चही वाचविण्यात त्यांना यश आले. सध्या हे अपारंपरिक जैवइंधन इतरांना न विकता स्वत:साठीच वापर करीत आहेत.जैव इंधन हे अक्षय ऊर्जास्रोत मानले जाते, अशी माहिती देऊन राणा सिंग म्हणाले, आमचा डीएनआर नावाचा वाहतूक व्यवसाय आहे. दररोज शेकडो लिटर डिझेल लागतो. यातून खर्च तरच वाढतच होता दुसरीकडे पर्यावरणाचीही हाणी होत असल्याचे लक्षात आले. वनस्पती पदार्थांच्या बायोमासपासून इंधर तयार होते. हे लक्षात आल्यानंतर ताडाळी येथे २०१९-२० मध्ये दशमेश बायो इनर्जी प्रकल्प सुरू केला. या प्रकल्पासाठी कच्चा माल औरंगाबाद, हैदराबाद व अन्य शहरातून आयात करतो.

एकमेव पर्यावरणपूरक प्रकल्पताडाली येथील प्रकल्पाची दरदिवशी २४ हजार लिटर बायोडिझल उत्पादन करण्याची क्षमता आहे. मात्र, सध्या दररोज सुमारे ३ ते ४ हजार लिटर उत्पादन घेतले जात आहे. सल्फर अथवा गंधकाचे हवेतले प्रदूषण होत नाही. हा नैसर्गिक व अपारंपरिक असा ऊर्जास्रोत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील जैवइंधनाचा हा एकमेव प्रकल्प आहे. सरकारने बायोडिझेल वापरण्यासाठी २५ टक्के अट ठेवली. सरकारच्या सर्व निकषांत हा प्रकल्प यशस्वी ठरला, अशी माहिती राणा सिंग यांनी दिली.

ऑक्सिजनयुक्त इंधन  डिझेल इंधनासारच्या वैशिष्ट्यांमुळे बायोडिझेल उच्च कार्यक्षमता डिझेल इंजिनमध्ये वापरली जाते. या इंधनात पॉलीसायक्लिक सुगंधी हायड्रोकार्बन नसतात. जोखमीशिवाय साठवून ठेवता येते. हे एक नूतनीकरणयोग्य़़, बायोडिग्रेडेबल ऊर्जास्रोत आहे. बायोडिझेलमध्ये उत्कृष्ट गुणधर्म आणि ऑक्सिजनयुक्त इंधन आहे. 

चंद्रपूर जिल्ह्यातील हा नावीन्यपूर्ण प्रकल्प आहे. नैसर्गिक व अपारंपरिक ऊर्जास्रोतांपासून इंधन मिळविता येते. इतरांनाही यापासून बोध घ्यावा. व्यवसाय करताना आम्ही पर्यावरणाचा विचार करून हा प्रकल्प उभारला. प्रकल्प सध्या उत्तमरित्या सुरू आहे. नवीन वर्षात पूर्ण क्षमतेने उत्पादन करण्याचा संकल्प आहे. -राणा सिंग, उद्योजक जैवइंधन, चंद्रपूर

 

टॅग्स :Fuel Hikeइंधन दरवाढ