शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

५० हजार हेक्टरवर कापूस, सोयाबीनची ‘बेडवर लागवड’ ; शेतकऱ्यांचा नव्या यशाचा फॉर्म्युला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 17:05 IST

वरोरा कृषी विभागाचे नियोजन : शेतकरी लागले कामाला

प्रवीण खिरटकरलोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : खरीप हंगामाला सुरुवात होताच कापूससोयाबीन पिकाची सरी वरंभा पद्धतीने बेडवर लागवड करण्याकरिता वरोरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात बेड तयार करण्याचे कार्य जोमात सुरू आहे. यावर्षी मागील वर्षीपेक्षा आठ हजार ते १० हजार हेक्टरवर बेड लागवडीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता असल्याने जवळपास ५० हजार हेक्टरवर बेड पद्धतीने कापूससोयाबीनची लागवड होणार आहे. त्याअनुषंगाने कृषी विभागाने नियोजन सुरू केला आहे.

चंद्रपूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकरराव तोटावार व मंडळ कृषी अधिकारी विजय काळे यांनी मागील वर्षी बेडवर लागवड करण्याकरिता सोयाबीनची अष्टसूत्री विषयावर मोठ्या प्रमाणात प्रशिक्षणावर भर दिला. वरोरा तालुक्यातील चिनोरा, शेगाव बु, राळेगाव आदी परिसरात शेतकरी कार्यशाळा घेण्यात आल्या. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये जागृती होऊन ४० हजार हेक्टरवर कापूस व सोयाबीनची बेडवर लागवड केली. अतिवृष्टी होऊनही पिके बुरशी रोगापासून रोगमुक्त राहिली व सरासरी उत्पन्नामध्ये वाढ झाली. यावर्षी शेतकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने मागील वर्षाचे अनुभव लक्षात घेता परिसरामध्ये सर्वत्र बेड तयार करण्याची मोहीमच हाती घेतली. 

वरोरा कृषी विभागातील तालुका कृषी अधिकारी रवी राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ कृषी अधिकारी विजय काळे, घनश्याम पाटील व उपकृषी अधिकारी प्रफुल्ल आडकिने, गजानन सवंडकर, लता दुर्गे यांनी विशेष प्रयत्न केले व शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्यक्ष जाऊन बेड तयार करण्याच्या पद्धती समजून सांगितल्या. त्यामुळे संपूर्ण परिसर आवश्यक पाऊस पडताच बेडवर कापूस व सोयाबीन लागवडीसाठी तयार आहेत. त्यानुसार नियोजन करण्यात आले आहे. 

कृषिमंत्र्याने घेतली होती दखलमागील वर्षी वरोरा तालुक्यात ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी झाली होती. त्याही परिस्थितीमध्ये तालुक्यातील ४० हजार हेक्टरवरील कापूस व सोयाबीन पिके वाचवण्यात तालुका कृषी विभागाला यश प्राप्त झाले होते. ही बातमी 'लोकमत' वृत्तपत्रात प्रसिद्ध होताच तत्कालीन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दखल घेतली होती. 

"वरोरा तालुक्याचे वार्षिक प्रजन्यमान ११०० ते १३०० मिमी असल्याने अतिवृष्टीमध्ये पिके पाण्याखाली येऊन शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होते. बिबी एफ व बेडवर लागवड करून नुकसान टाळता येते हे प्रशिक्षण व मार्गदर्शनातून शेतकऱ्यांना पटवून देण्यात आले. मागील वर्षीच्या चांगला अनुभवाने यंदा पेरा वाढला."- विजय काळे, मंडळ कृषी अधिकारी, शेगांव

"मागील वर्षी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली बेडवर टोकण पद्धतीने सोयाबीन लागवड केल्यामुळे ऑगस्ट महिन्यात दोनवेळा अतिवृष्टी होऊनसुद्धा पिकाची वाढ चांगली होऊन सरासरी उत्पादनात ३ ते ४ क्विंटलने वाढ दिसून आली."- प्रमोद कुंभारे, शेतकरी, अर्जुनी 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरfarmingशेतीcottonकापूसSoybeanसोयाबीन