शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘सुंदर’ धान पुरामुळे झाले कुरुप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 06:00 IST

निसगार्चा लहरीपणा, वेळोवेळी पावसाची हुलकावणी, पावसाळ्यात शेवटी पावसाने साथ दिली नाही तर पाण्याअभावी धान पिक धोक्यात येण्याची शक्यता जास्त असते. धान पिकास शेवटपर्यत पाण्याची गरज असते. त्यामुळे ज्या ठिकाणी कृत्रिम पाण्याची सोय नाही, अशा ठिकाणी शेतकरी कमी कालावधीत येणाऱ्या धान पिकाची रोवणी करतात.

ठळक मुद्देधान पीक डोळ्यादेखत उद्ध्वस्त : शेतकऱ्याचे अतोनात नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कब्रम्हपुरी : ब्रम्हपुरी तालुक्यातील पारडगाव येथील शेतकरी अरुण पिलारे यांनी यावर्षी खरीब हंगामात आपल्या शेतात ‘सुंदर’ जातीच्या धान पिकाची रोवणी केली. समाधानकारक पाऊस, योग्य हवामान यामुळे सुंदर धान पीक नावाप्रमाणेच चांगलं बहरुन आले. सुंदर धान प्रजाती कमी कालावधीत येणारी असल्याने मागील आठवड्यात धानाचा पूर्णपणे निसवाही झालेला होता. धान पिकाच्या लोंबाचे सौंदर्य पाहून सदर शेतकरी आनंदीत होऊन चांगल्या उत्पादनाचे स्वप्न मनात रंगवत असतानाच मागील आठवडयात ब्रम्हपुरी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने आलेल्या पुराने मात्र सदर शेतकऱ्याचे धान पीक भुईसपाट होऊन सुंदर धान पिकाचे सौंदर्य पुराच्या पाण्याने हिरावून घेतल्याने जवळपास ३० ते ४० हजार रुपयांचे नुकसान झाल्याने सदर शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.निसगार्चा लहरीपणा, वेळोवेळी पावसाची हुलकावणी, पावसाळ्यात शेवटी पावसाने साथ दिली नाही तर पाण्याअभावी धान पिक धोक्यात येण्याची शक्यता जास्त असते. धान पिकास शेवटपर्यत पाण्याची गरज असते. त्यामुळे ज्या ठिकाणी कृत्रिम पाण्याची सोय नाही, अशा ठिकाणी शेतकरी कमी कालावधीत येणाऱ्या धान पिकाची रोवणी करतात. ब्रम्हपुरी तालुक्यातील पारडगाव येथील अरुण पिलारे या शेतकऱ्याने सुद्धा आपल्या शेतात कमी कालावधीत येणाऱ्या सुंदर प्रजातीच्या धानाची रोवणी केली होती.परंतु ब्रम्हपुरी तालुक्यात मागील आडवडयात झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराने मात्र सदर शेतकऱ्याचे शेतातील धान पीक पूर्णपणे भूईसपाट झाले. यामुळे सदर शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून हातात आलेले धानपीक अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराच्या पाण्यात सडल्याने सदर शेतकऱ्याचे बरेच मोठे नुकसान झाले असून सदर शेतकऱ्याला त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती