शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस पडताना वीज उपकरणांपासून राहा सावधान ! अपघात टाळण्यासाठी महावितरणचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 16:34 IST

Nagpur : सध्या पावसाचे दिवस असून धोका टाळण्यासाठी प्रत्येकांनी सुरक्षा बाळगणे आवश्यक आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर आता पावसाळ्याचे वेध लागले आहेत. या पार्श्वभूमीवर, संभाव्य धोके टाळण्यासाठी महावितरणने कंबर कसली आहे. मान्सूनपूर्व देखभाल आणि दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. नागरिकांनीही स्वतःच्या स्तरावर वीज उपकरणांची विशेष काळजी घेणे अत्यावश्यक आहे, असे आवाहन महावितरणने केले आहे. दरम्यान, वीज खांबाजवळ जाणे, स्पर्श करणे टाळले पाहिजे. विशेषतः ग्रामीण भागामध्ये वीज खांबाना बैल बांधले जाते, ते टाळले पाहिजे. 

अडचण आल्यास संपर्क साधा :विजेसंबंधित कोणत्याही समस्यांसाठी किंवा आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी १८००२३३३४३५, १८००२१२३४३५ आणि १९१२ या टोल-फ्री क्रमांकावर २४ तास संपर्क साधता येईल. या क्रमांकांवर वीजपुरवठा खंडित झाल्याच्या तक्रारीसोबतच वीज अपघात आणि वीजबिलांसंबंधी तक्रारी देखील नोंदवण्याची सोय उपलब्ध आहे. 

घरात सुरक्षित राहाओल्या हातांनी विद्युत उपकरणांना स्पर्श करू नका. विद्युत उपकरणांचा पाण्याशी संपर्क येणार नाही, याची दक्षता घ्या. उपयोग नसताना विद्युत उपकरणांचे प्लग बोर्डातून काढून ठेवा. घरातील अर्थिगची नियमित तपासणी करा. ज्यांचे घर फयाचे आहे, त्यांनी पावसाळ्यापूर्वी घरातील वायरिंगची तपासणी करून घ्यावी, विजा कडकडत असताना टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन यांसारखी विद्युत उपकरणे वापरणे टाळा. प्लग काढून ठेवणे सुरक्षेसाठी योग्य आहे.

घराबाहेर अशी घ्या काळजीपावसाळ्याच्या दिवसांत विजेच्या खांबापासून सुरक्षित अंतर ठेवा, वीज रोहित्र किंवा खांबाजवळ खड्डा असल्यास आणि त्यात पाणी साचले असल्यास त्यापासून दूर राहा. घराजवळ वीज तारा लोंबकळत असल्यास त्याची माहिती तत्काळ महावितरणच्या कर्मचाऱ्यांना द्या. घराशेजारी वीज तारा गेल्या असल्यास स्पर्श करू नका.

महावितरणची मान्सूनपूर्व कामे सुरू : नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

  • पावसाळ्यापूर्वी आपल्या परिसरातील वीज खांब, तारा, रोहित्र किंवा इतर कोणत्याही विद्युत उपकरणांत काही बिघाड आढळल्यास स्वतः दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करू नये. त्याऐवजी त्वरित आपल्या भागातील महावितरणच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा.
  • वीज खांबांना स्पर्श करणे टाळा आणि पावसाळ्यापूर्वी घरातील वायरिंग व अर्थिग तपासून संभाव्य धोका टाळा. अनेकदा पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित झाल्यास काही नागरिक त्वरित वीज सुरू करण्याच्या प्रयत्नात अकुशल वायरमनची मदत घेतात. मात्र, असे करणे धोकादायक ठरू शकते आणि त्यामुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे, अधिकृत तंत्रज्ञांचीच मदत घ्यावी, पावसाच्या दिवसामध्ये वीज खांबापासून दूर राहण्याचे तसेच घरातील अर्थिग तपासण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर