शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

काळजी घ्या! चंद्रपुरात शासकीय व खासगी रुग्णालये कोरोनाने फुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 21:15 IST

बघता बघता चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या ५ हजारांच्या घरात गेली आहे. आणखी रुग्णसंख्येत झपाट्याने वाढच होत आहे.

ठळक मुद्देबेड कमी रुग्ण अधिक कोरोना रुग्णांची बेडसाठी धडपड

लोकमत न्युज नेटवर्कचंद्रपूर : बघता बघता चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या ५ हजारांच्या घरात गेली आहे. आणखी रुग्णसंख्येत झपाट्याने वाढच होत आहे. रुग्णांना ठेवण्यासाठी आता जागाच शिल्लक न राहिल्याने जिल्हा प्रशासनाने होम आयसोलेशनचा पर्याय पुढे आणला. प्रकृती बिघडल्यानंतर कोरोनाचे निदान झालेल्या रुग्णांना कोविड-१९ सेंटरमध्ये ठेवले जात आहे. आजघडीला सर्व शासकीय व खासगी रुग्णालये फुल्लं झाली आहे. रुग्ण वाढीचा हा दर कायम राहिल्यास गंभीर स्थितीतील रुग्णांना ठेवण्यासाठी मोठी अडचण निर्माण होण्याची भीती वैद्यकीय क्षेत्रातील मंडळी व्यक्त करीत आहे.

शुक्रवारी रुग्णांचा आकडा ४ हजार ६६२ वर गेला. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार हा आकडा वाढीवरच आहे. जनसंपकार्तून कोरोनाचा प्रसार गतीने होत आहे. चंद्रपूर आणि बल्लारपूर शहरात चार दिवसांचा जनता कर्फ्यू सुरू आहे. याचा काही परिणाम दिसून येतील, परंतु त्यानंतर नागरिकांनी मास्क न लावता बाहेर पडणे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळले नाही तर कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढतील. या वाढत्या रुग्णांसाठी खाटांची व्यवस्था करण्याचे मोठे आव्हान जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणेपुढे निर्माण झाले आहे. चंद्रपूरात सामान्य रुग्णालय व शासकीय वेद्यकीय महाविद्यालयांमध्ये वेंटीलेटर आॅक्सिजनची व्यवस्था आहे. या ठिकाणी गंभीर स्थितीतील कोरोना रुग्णांना ठेवले जात आहे. पंरतु येथील क्षमतेपेक्षा रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे चंद्रपूरातील सुविधा असलेल्या काही खासगी रुग्णालयांचेही कोविड केअर सेंटरमध्ये रुपांतरीत करण्यात आले. ही रुग्णालयेही फुल्लं झाल्याने बेडसाठी कोरोना रुग्णांची धडपड सुरू झालेली आहे. नव्या रुग्णांसाठी सोईयुक्त रुग्णालये शोधणे जिल्हा प्रशासनापुढे मोठे आव्हान आहे.

कारोनाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. यावर मात करण्याचे प्रयत्न सुरू आहे. आता नागरिकांची स्वत:ची काळजी घेतली नाही तर ही स्थिती हाताबाहेर जायला वेळ लागणार नाही. सर्व सोइंर्नी युक्त अशा पाचशे बेडची व्यवस्था करण्याचे काम गतीने सुरू आहे. हे रुग्णालय सुरू झाल्यास स्थिती आटोक्यात येईल, अशी अपेक्षा आहे.- डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक, चंद्रपूर.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस