शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सावधान ! सिगारेट ओढणे पडू शकते महागात !

By admin | Updated: August 9, 2016 00:42 IST

सध्या तरुणाईमध्ये व्यसनाधिनतेचे प्रमाण वाढले आहे. वाट्टेल तिथे सिगारेट ओढून मोठ्या दिमाखाने धूर फेकला जातो

दोनशे रुपयांचा दंड : धुम्रपानविरोधात प्रशासनाचे गंभीर पाऊलचंद्रपूर : सध्या तरुणाईमध्ये व्यसनाधिनतेचे प्रमाण वाढले आहे. वाट्टेल तिथे सिगारेट ओढून मोठ्या दिमाखाने धूर फेकला जातो. तरुणांमध्ये सध्या क्रेझ असलेले हे धोकादायक व्यसन आता त्यांना महागात पडू शकते. आता सार्वजनिक ठिकाणी तंबाखू खाणे वा सिगारेट पिताना आढळल्यास तात्काळ दोनशे रुपये दंड वसूल केला जाणार आहे. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत ही कारवाई केली जाणार आहे.तंबाखू सेवनामुळे होणारे कर्करोगाचे प्रमाण अलिकडे वाढले आहे. याची दखल घेत शासनाने जिल्ह्यात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाच्या आदेशानुसार सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन समन्वय समिती तयार केली आहे. स्वत: जिल्हाधिकारी याचे अध्यक्ष असून सचिव जिल्हा शल्य चिकित्सक आहेत. ही समिती जनजागृती करण्यासोबतच सार्वजनिक ठिकाणी तंबाखू खाणारे व धूम्रपान करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईदेखील करणार आहे.राज्यातील काही जिल्ह्यात हा राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम सुरू केला आहे. याचे चांगले परिणाम दृष्टीस पडत आहे. त्यामुळे ही योजना चंद्रपूर जिल्ह्यातही राबविण्याचा निर्णय येथील प्रशासनाने घेतला आहे. शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यात या संदर्भात आतापर्यंत दोनदा बैठक घेण्यात आली आहे. यात जिल्हा समन्वय समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असून सचिव जिल्हा शल्य चिकित्सक आहेत. यासोबत समितीत पोलीस विभाग, कृषी विभाग, शिक्षण विभाग, माहिती अधिकारी, कामगार विभाग, अन्न व औषध प्रशासन, विक्रीकर विभाग, जिल्हा आरोग्य अधिकारी व महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे. आता ही जिल्हा समन्वय समिती जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयात समिती तयार करणार आहे. तालुकास्तरावरही एक समिती गठीत केली जाणार आहे. ही समिती तंबाखू नियंत्रण कायदा २००३ ची अंमलबजावणी करणार आहे. या कायद्यांतर्गत तंबाखू खाणे व सिगारेट ओढणाऱ्यांवर कलम ४,५,६ (अ), ७ अंतर्गत दंडात्मक कारवाई करण्याचा अधिकार आहे. रुग्णालय परिसर, बसस्थानक, रेल्वे स्थानक व इतर सार्वजनिक ठिकाणी कुणी धुम्रपान करताना आढळला तर त्याच्याकडून तात्काळ २०० रुपये दंड वसूल करण्याचा अधिकार समिती सदस्यांना दिला आहे. (शहर प्रतिनिधी)जिल्ह्यात तंबाखू नियंत्रण कार्यक्रम लवकरच सुरू करण्यात येत आहे. यासाठी जिल्हा समन्वय समितीदेखील तयार करण्यात आली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात धुम्रपान करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणार आहोत. कुणीही परिसरात सिगारेट व तंबाखू खाताना आढळला तर त्याच्याकडून २०० रुपये दंड वसूल केला जाणार आहे.-डॉ. विनोद पाकधुने,जिल्हा असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अधिकारी,जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर.