शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
2
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
3
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
4
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
5
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
6
योगेंद्र यादवांचा पुन्हा दावा; भाजपाचं टेन्शन वाढणार, कुठल्या राज्यात किती जागांचा फटका?
7
प्रेम, शारीरिक शोषण, लग्न अन् तरूणाने काढला पळ; प्रेयसीने भररस्त्यात पकडून दिला चोप
8
Manoj Jarange Patil ...तर आपल्याला सत्तेत जावं लागेल; जातीवादावरून मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान
9
शेअर बाजारात मोठी अस्थिरता, ४ जूनला भाजप सरकार आलं नाही तर काय असेल स्थिती?
10
राहुल गांधींच्या सभेमध्ये मंच कोसळला, नेतेमंडळींचा एकच गोंधळ उडाला
11
KKR चे विजेतेपद ठरणार गौतम गंभीरच्या टीम इंडियाचा प्रशिक्षक बनण्याचा मार्गातील अडथळा!
12
हिरव्या रंगाची पैठणी अन् हाय हिल्स! कान्समधील अभिनेत्रीच्या लूकची चर्चा, सोशल मीडियावर होतंय कौतुक
13
"सोनिया गांधींना तुरुंगात टाकण्याची भाषा करणारे आता...", PM मोदींचा केजरीवालांवर निशाणा
14
कान्समध्ये पुरस्कार पटकावणाऱ्या पायल कपाडिया आहेत आरोपी नंबर 25? पुढील महिन्यात कोर्टात...
15
अरे देवा! पतीने आणल्या 60 प्रकारच्या नेलपॉलिश; सासूने लावताच सून नाराज, ठेवली 'ही' अट
16
"४ जूननंतर ईडीपासून वाचण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ..."; राहुल गांधींचा हल्लाबोल
17
"ससून रुग्णालय आहे की गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा?"; ललित पाटीलचा उल्लेख करत काँग्रेसचा सवाल
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी उच्चांकी स्तरावरून घसरला; Adani Ent आपटला, डिव्हिस लॅबमध्ये तेजी
19
पापुआ न्यू गिनीत भूस्खलनाने हाहाकार; 2000 लोक जिवंत जमिनीखाली गाडले गेले...
20
"विभव कुमार यांना जामीन मिळाला तर मला आणि माझ्या...", स्वाती मालीवाल यांचा कोर्टात मोठा दावा

निराधारांना अर्थसंकल्पातून मिळावा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 11:09 PM

शासनाचा सामाजिक न्याया विभागाकडून दारिद्र्य रेषा व गरीब कुटुंबातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी दरमहा अनुदान दिले जाते. योजनेची अंमलबजावणी तहसील कार्यालयाकडून होते.

ठळक मुद्देअनुदान वाढीची प्रतीक्षा: सामाजिक न्याय विभागाच्या योजना

अनेकश्वर मेश्राम ।आॅनलाईन लोकमतबल्लारपूर: शासनाचा सामाजिक न्याया विभागाकडून दारिद्र्य रेषा व गरीब कुटुंबातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी दरमहा अनुदान दिले जाते. योजनेची अंमलबजावणी तहसील कार्यालयाकडून होते. सद्य:स्थिती दरमहा केवळ ६०० रुपये अनुदान मिळते. शेजारच्या तेलंगण राज्याच्या धर्तीवर लाभार्थ्यांना अनुदान वाढीची प्रतीक्षा आहे. आगामी अर्थसंकल्पातून निराधारांना आधार मिळावा, अशी मागणी लाभार्थ्यांनी केली आहे.केंद्र व राज्य सरकारच्या समन्वयातून सामाजिक न्याय विभाग दारिद्र्य रेषेखालील विधवांना कुटुंब अर्थ सहाय्य योजना, संजय गांधी निराधार योजना ६५ वर्षांवरील वृद्धांसाठी श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना, शेतकरी, शशेतमजूर, विधवा, अल्पभूधारकांना इंदिरा गांधी वृदञधापकाळ निवृत्ती वेतन योजना राबवित आहे. योजनेतील पात्र लाभार्थ्यांना दर महिन्याला ६०० रूपये अनुदान बँकेच्या शाखेमार्फत दिले जाते. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी निराधारांच्या अनुदानात वाढ करावी, अशी मागणी आहे.राज्यात १९८० पासून संजय गांधी योजना, १९९१ ला इंदिरा गांधी राष्टÑीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना आणि २०१४ पासून ६५ वर्षांवरील आर्थिकदृष्ट्या निराधार व्यक्तींसाठी श्रावण बाळ सेवा योजन लागू केली. आघाडी सरकारने योजनेत टप्प्याटप्प्याने वाढ केली. केंद्र व राज्यात सत्ताबदल होवून युतीचे सरकार आले. चार वर्षांचा कालावधी झाला. पण, निराधारांच्या अनुदानात अद्याप वाढ झाली नाही. ९ मार्चला अर्थसंकल्प सादर होणार आहे. यामध्ये निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी तेलंगण राज्याच्या धर्तीवर भरीव तरतूद करुन आधार देणे गरजेचे आहे. राज्याचे अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थ संकल्पात तरतूद करण्यासाठी सूचना मागविली होती. त्यामुळे निराधार संवर्गातील लाभार्थ्यांना दिलासा देण्यासाठी राज्याचा सादर होणारा अर्थसंकल्प आधार ठरावा, अशी लाभार्थ्यांची अपेक्षा आहे.अशा आहेत निराधार योजनासामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून संजय गांधी निराधार योजना राबविली जाते. योजनेची अंमलबजावणी प्रत्येक तहसील कार्यालय करते. यामध्ये विधवा निराधार महिला, अपंग संवर्गातील अंध, अस्थिव्यंग, मुकबधीर, मतिमंद, कर्णबधीर, क्षयरोग, कर्करोग, एचआयव्ही बाधित, पक्षघात, महिला संवर्गात निराधार, विधवा, घटस्फोट प्रक्रियेतील महिला, अत्याचारित, परितकत्या, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील सदस्य, अनाथ मुले आणि तृतीयपंथी संवर्गाना योजनेचा लाभ दिला जातो. श्रावणबाळ व इंदिरा गांधी राष्टÑीय निवृत्ती वेतन योजनेत ६५ वर्षांवरील वृद्धांनाही लाभ घेता येते.आॅनलाईन अर्ज निराधारांना त्रासदायकसरकारने सर्वत्र आॅनलाईन अर्ज सादर करण्याची मोहीम सुरु केली आहे. यासाठी आपले सरकार सेतू केंद्राची निर्मिती केली. मात्र, बल्लारपूर तहसील कार्यालयातील आपले सरकार सेतू केंद्रात निराधारांना आॅनलाईन अर्ज करण्याची सुविधा अद्याप उपलब्ध करुन दिले नाही. तालुक्यात सेतू केंद्रात १५ जणांनी नोंदणी केल्याची माहिती आहे. मात्र, केवळ आठ ते दहा सेतू केंद्र सुरु आहेत. त्यातही निराधारांना आॅनलाईन अर्ज सादर करण्यासाठी विविध त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पूर्वी प्रमाणेच अर्ज सादर करण्याची पद्धत सुरू ठेवावी, अशी मागणी आहे.