शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
5
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
6
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
7
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
12
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
14
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
15
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
16
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
17
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
18
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
19
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
20
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा

काँग्रेसच्या जडणघडणीत बरय्या यांचे मोठे योगदान

By admin | Updated: October 19, 2015 01:35 IST

शहराच्या विकासात माजी नगराध्यक्ष स्व. एम. बाल. बरैय्या यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. १९८० च्या दशकात काँग्रेस पक्ष अडचणीत आला होता.

नरेश पुगलिया : बल्लारपुरात पार पडली श्रद्धांजली सभाबल्लारपूर : शहराच्या विकासात माजी नगराध्यक्ष स्व. एम. बाल. बरैय्या यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. १९८० च्या दशकात काँग्रेस पक्ष अडचणीत आला होता. त्यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षाला मोठा हातभार लावला. बल्लारपूर शहराची धुरा यशस्वीपणे सांभाळली. काँग्रेसची विचारसरणी अनेकांना पटवून दिली. काँग्रेसच्या जडणघडणीत एम. बाल बरय्या यांचे योगदान मोठे आहे, असे प्रतिपादन माजी खासदार तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नरेश पुगलिया यांनी केले. बल्लारपूर शहर काँग्रेस, तालुका काँग्रेस नगर परिषद व बल्लारपूर पेपर मिल मजदूर सभेच्यावतीने स्थानिक बालाजी सभागृहात रविवारी शोकसभा व श्रद्धांजली कार्यक्रम पार पडला. यावेळी अध्यक्षस्थानावरुन नरेश पुगलिया बोलत होते. यावेळी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार अ‍ॅड. एकनाथ साळवे, माजी आमदार प्रभाकर मामुलकर, मूलचे माजी नगराध्यक्ष चंद्रकांत पूरम, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, नगराध्यक्ष छाया मडावी, माजी नगराध्यक्ष दिलीप माकोडे, डॉ. सुरेश महाकुलकर, मजदूर सभेचे महासचिव वसंत मांढरे, अ‍ॅड. अविनाश ठावरी, अ‍ॅड. मेघा भाले, पद्माकर पांढरे, एम. व्यंकटेश बाल बरैय्या यांची उपस्थिती होती.संचालन घनश्याम मुलचंदानी यांनी तर आभार देवेंद्र आर्य यांनी मानले. यावेळी प्रवीण पडवेकर, अशोक नागापुरे, देवेंद्र बेले, नासिर खान, भास्कर माकोडे, सत्यनारायण, अनिल खरतड, पंचायत समितीचे उपसभापती अनकेश्वर मेश्राम, चेतन गेडाम, गजानन दिवसे, रामदास वाग्दरकर, अनिल तुंगीडवार व डेव्हीड कामपेल्ली यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)