शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

बापूू,आपला गावच बरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 05:01 IST

ज्यांचे आई-वडील गावाकडे आहेत अशांचा मुलगा, सून व नातवडांनी सुरक्षित राहता येईल. या भावनेतून आपले गाव गाठले. मात्र जे आपल्या आई-वडीलासह शहरात गेले असे अनेक जण आपण आपल्या गावी परतावे की, नाही या मनस्थितीत आजही शहरात वास्तव्यास आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील मुंबईच्या तुलनेत पुण्यात गेलेल्यांची संख्या अधिक आहे.

ठळक मुद्देकोरोनाचा परिणाम : अनेकजण परतत आहे आपल्या गावी

लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : पोट भरण्यासाठी काम शोधून स्थायीक झालेले व नोकरीसाठी शहरात गेलेल्या शेकडो नागरिकांनी कोरोनाच्या धास्तीने बाबू, आपला गावच बरा म्हणत गावाचा रस्ता धरला आहे.ज्यांचे आई-वडील गावाकडे आहेत अशांचा मुलगा, सून व नातवडांनी सुरक्षित राहता येईल. या भावनेतून आपले गाव गाठले. मात्र जे आपल्या आई-वडीलासह शहरात गेले असे अनेक जण आपण आपल्या गावी परतावे की, नाही या मनस्थितीत आजही शहरात वास्तव्यास आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील मुंबईच्या तुलनेत पुण्यात गेलेल्यांची संख्या अधिक आहे.कोरोना व्हायरसचे रुग्ण मुंबई व पुणे येथेच जास्त असल्याने या शहरात आपण राहिलो तर आपण जीवंत राहू शकत नाही या भितीपोटी शेकडो जण गावी आले आहेत. मात्र परिस्थिती गंभीर बनली असून गावी परत येण्यासाठी बस सुद्धा नाहीत, अशी परिस्थिती आहे. अनेक जण शासकीय नोकरीनिमित्त किंवा कंपनीत नोकरीला आहेत, अशा मंडळीच्या मनात पुणे, मुंबई, शहर सोडायचे आहे, मात्र नोकरी असल्याने अनेक जण सध्या तरी आपल्या गावी येवू शकले नाहीत.परीस्थिती केव्हा कशी येथे याची जाण कुणालाही नाही. आजच्या परिस्थितीत खेड्यात राहायला कुणी तयार नाही. खेड्यात जो राहतो तो कोणत्याही जाती धर्माचा असला तरी त्याला आपले भविष्य खेड्यात राहून सुधारणार नाही याची जाण आली. त्यामुळे आपल्याला काही बनायचे असेल अथवा पोट भरायचे असेल तर शहात जाण्याशिवाय पर्याय नाही हे ओळखूनच प्रत्येक गावातील अनेक जणांनी शहर गाठून आपले बस्तान बसविले. मात्र कोरोना व्हायरसचा आजार जगभरात पसरला. हजारो लोक मृत्युमुखी पडले आहेत. आपल्या देशातही या आजाराने अनेक रुग्ण आहे. शेकडो जणांचे रिपोर्ट पाझिटिव्ह आले आहेत. कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी जो तो आपआपल्या परीने प्रयत्न करीत आहे. मात्र जीव धोक्यात घालायचा नसेल तर खेड्यात राहणे अधिक सुरक्षित आहे, हे कोरोनाच्या भितीपोटी का होईना, सगळ्याना समजले आहे. खरा भारत शोधायचा असेल तर खेड्यात चला असे महात्मा गांधी सांगत होते. आता कोरोनाच्या भितीपोटी शहरातले सगळे सोडून आधी आपले गाव गाठत असल्याचे चित्र सध्या शहरात बघायला मिळत आहे.परिस्थिती बदललीजिल्ह्यातील अनेक युवक व बेरोजगार, नागरिक कामाच्या शोधात हैदराबाद, पुणे, मुंबई, आदी शहरात गेले आहे. मोठ्या शहरात कोणताही माणूस काम केल्यावर उपाशी मरत नाही, याची जाण असल्याने अनेकांनी मागील काही वर्षात शहर गाठून आपले बस्तान बसविले. मात्र आता परिस्थिती बदलली आहे.अनेक परतीच्या मार्गावरसुटीच्या दिवसात गावाकडे येणारे बहुतांश शहरी कुटुंबीय कोरोनामुळे गावाचा रस्ता धरला आहे. गावात शहराच्या तुलनेत कमी धोका असतो हे ओळखून शेकडो कुटुंबीय आपल्या गावी परतले आहेत. तर अनेक परतण्याच्या मार्गावर आहे. मात्र साधने नसल्याने ते अडले आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या