शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

बापरे..! चंद्रपुरात आढळले विदेशी बनावटीचे ई-सिगारेट, वेब फ्लेव्हर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2022 22:46 IST

ई-सिगारेटमध्ये तंबाखूचा वापर केला जात नाही. त्यातून राख तयार होत नाही आणि दातांवर डाग पडत नाहीत. ई-सिगारेटच्या टोकाला एलईडी लाइट असतो. सिगारेट ओढताना खऱ्या सिगारेटप्रमाणे प्रकाशमान होते. ई-सिगारेटमध्ये बॅटऱ्यांचा समावेश असतो. ई-सिगारेटवर बंदी घातली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरातील रामनगर परिसरातील दुर्गा मंदिराजवळील निशा प्रोव्हिजन व नागपूर मार्गावरील टेक्स स्मोकिंग या दुकानात धाड टाकून रामनगर पोलिसांनी विदेशी बनावटीचे २५ ई-सिगारेट व वेब फ्लेव्हर असा एकूण ३९ हजारांचा मुद्देमाल मंगळवारी जप्त केला. याप्रकरणी दुकानचालकांवर गुन्हा दाखल झाला. ई- सिगारेट जप्त केल्याची जिल्ह्यातील ही पहिलीच कारवाई आहे.ई -सिगारेट व वेब फ्लेव्हरवर राज्यात बंदी आहे. मात्र, छुप्या मार्गाने मोठ्या प्रमाणात ई सिगारेटची विक्री होत आहे. या सिगारेटमुळे कर्करोगाचा धोका अधिक असतो. महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थी ई- सिगारेटच्या आहारी गेल्याचे पोलिसांच्या तपासात दिसून आले आहे. रामनगर पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी रामनगरमधील दुर्गा मंदिरासमोरील निशा प्राेव्हिजन व नागपूर मार्गावरील टेक्स स्मोकिंग या दोन दुकानांत धाड टाकून झडती घेतली असता, अनुक्रमे ६ व १९ असे एकूण २५ ई -सिगारेट आढळून आले. या सर्व ई- सिगारेट्स जप्त करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक राजेश मुळे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक हर्षल एकरे, पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, प्रशांत शेंद्रे, किशोर वैरागडे, विनोद यादव, नीलेश मुळे, सतीश अवथरे, लालू यादव, विकास जुमनाके, संदीप कामडी, हिरालाल गुप्ता, विकास जाधव आदींनी केली.

काय असते ई-सिगारेट?ई-सिगारेटमध्ये तंबाखूचा वापर केला जात नाही. त्यातून राख तयार होत नाही आणि दातांवर डाग पडत नाहीत. ई-सिगारेटच्या टोकाला एलईडी लाइट असतो. सिगारेट ओढताना खऱ्या सिगारेटप्रमाणे प्रकाशमान होते. ई-सिगारेटमध्ये बॅटऱ्यांचा समावेश असतो. ई-सिगारेटवर बंदी घातली आहे.

ई-सिगारेटचे कीट आकर्षकध्रूमपानाची समस्या सोडवण्यात ई-सिगारेट अयशस्वी ठरली असून, शाळकरी मुलांमध्ये याचे फॅड वाढले आहे, म्हणूनच ई-सिगारेटचं उत्पादन, आयात-निर्यात, वाहतूक, विक्री, साठवणूक आणि जाहिरात या सगळ्यांवर बंदी आहे. तरुणांना ई-सिगारेट कूल वाटते. त्याचे कीट आकर्षक आहे. हे युवावर्गाला आकर्षित करते. ई-सिगारेटमध्ये निकोटिन असते. त्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. 

शालेय विद्यार्थ्यांना सिगारेटचे व्यसनचंद्रपुरात शिक्षण घेत असलेली बरीच मुले गांजा, ड्रग पावडर तसेच इलेक्ट्रॉनिक सिगारेटच्या नशेच्या विळख्यात सापडले आहेत. मागणी वाढू लागल्याने काही व्यावसायिक छुप्या मार्गाने या वस्तू चंद्रपुरात आणत आहेत. यातून नशा करण्याचे प्रमाण  वाढले आहे. इलेक्ट्रॉनिक सिगारेट हे पेनसारखे दिसते. ती शाळेच्या बॅगमध्ये मुले शाळेत घेऊन जात असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

 

टॅग्स :CigaretteसिगारेटSmokingधूम्रपान