शहरं
Join us  
Trending Stories
1
जाळपोळ, तोडफोडीसह नेपाळ पेटलं! हजारो युवक रस्त्यावर उतरले; गोळीबारात आतापर्यंत ९ मृत्यू ८० जखमी
2
जीव तुटला...! हजारो नव्या कोऱ्या गाड्यांचा कचरा झाला; पुरात बुडाल्या मारुती, ह्युंदाईच्या कार
3
लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीत चोरांनी १०० मोबाईल अन् सोन्याच्या चेन केल्या लंपास; चार आरोपींना अटक
4
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
5
पूरग्रस्त भागात गेलेल्या काँग्रेस खासदाराला ग्रामस्थांनी खांद्यावर घेतलं, भाजपाने Video वरुन घेरलं
6
समृद्धी महामार्गावर अडीच कोटींची वॅक्सीन चोरी, आंतरराज्य टोळीला वाशिम पोलिसांनी केली अटक
7
मेहुल चोक्सीला जेलमध्ये स्वच्छ पाणी अन् टॉयलेट देणार; भारताने बेल्जियमला दिली १४ सुविधांची यादी
8
सरकारे उलथवून टाकण्यात तरुणाई सर्वात पुढे; आतापर्यंत 'या' देशांमध्ये झाले सत्तापालट
9
पतीला सोडून प्रियकरासोबत पळून गेली ५ मुलांची आई, लग्न केलं पण...; गावात रंगला हाय वोल्टेज ड्रामा!
10
विमा स्वस्त होणार म्हणून आनंद झाला होता? आता प्रीमियम वाढण्याच्या शक्यतेने वाढली चिंता
11
"क्षमतेपेक्षा जास्त हुंडा दिला तरीही..."; लेकीने लग्नाच्या ९ महिन्यांतच संपवलं जीवन, आईचा टाहो
12
नेपाळमध्ये सोशल मीडिया Appsवर बंदी; Gen-Z आक्रमक, सरकारविरोधात तीव्र निदर्शने
13
एक लाख व्ह्यूज मिळाल्यावर इंस्टाग्राम किती पैसे देते? जाणून व्हाल हैराण!
14
"विरोधकांच्या ठिकऱ्या उडणार, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांनी..."; भाजपाचा टोला
15
धक्कादायक! जिथे CCTV तिथेच सामान तपासा; रेल्वे प्रवाशांचं साहित्य तपासणारे पोलीसच करतायेत लूट
16
लाल किल्ल्यावरून १ कोटी रुपयांचा कलश चोरणारा पकडला गेला अन् धक्कादायक खुलासा झाला!
17
Asia Cup 2025 : संजू सॅमसन संदर्भात रवी शास्त्रींचं मोठं वक्तव्य; गंभीरला त्यातील गांभीर्य कळणार का?
18
एका वनडे मालिकेत सर्वाधिक धावा करणारे ५ मधल्या फळीतील फलंदाज!
19
मंदीच्या उबरठ्यावर अमेरिका! कोरोनापेक्षाही भीषण स्थिती;२००८ मध्ये भविष्यवाणी करणाऱ्यानं पुन्हा दिला इशारा
20
Pitru Paksha 2025: पितृपक्षाची सुरुवात कोणी व कोणासाठी केली? प्रत्येकाला हे माहीत असलेच पाहिजे!

बापरे...सेवानिवृत्तीला सात वर्षे, तरीही निवृत्ती वेतनापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2022 05:00 IST

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या बल्लारपूर विभागांतर्गत जिल्ह्याच्या अतिदुर्गम आदिवासी बहुल क्षेत्र असलेल्या जिवती उपक्षेत्रातून २०१५ रोजी तंत्रज्ञ पदावरून बापूजी गणपत जंपलवार हे सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतर त्यांना निवृत्तीवेतन सुरू होणे अपेक्षित होते; परंतु प्रशासनाच्या वतीने काय कार्यवाही झाली माहिती नाही. त्यांची पेन्शन अजूनही सुरू झाली नाही. दरम्यान, त्यांची प्रकृती ठिक नसल्याने ते बेडवरच होते. त्यामुळे याबाबत त्यांना साधी चौकशीही करता आली नाही.

नितीन मुसळेलोकमत न्यूज नेटवर्कसास्ती : सेवानिवृत्तीनंतरचे जीवन जगणे तसे कठीणच,  वृद्धापकाळामुळे धावपळही मंदावते. अशातच सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतनाकरिता तब्बल सात वर्षांपासून सुरू असलेल्या पायपिटीमुळे कंटाळून आत्महत्येचा पर्याय पुढे केला. यानंतरही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करून लालफितशाहीचा परिचय दिला आहे. ही व्यथा म.रा. वीज वितरण कंपनीत जिवती येथून सेवानिवृत्त झालेल्या राजुरा तालुक्यातील वरुर रोड येथे राहणाऱ्या एका कर्मचाऱ्याची  आहे.प्राप्त माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या बल्लारपूर विभागांतर्गत जिल्ह्याच्या अतिदुर्गम आदिवासी बहुल क्षेत्र असलेल्या जिवती उपक्षेत्रातून २०१५ रोजी तंत्रज्ञ पदावरून बापूजी गणपत जंपलवार हे सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतर त्यांना निवृत्तीवेतन सुरू होणे अपेक्षित होते; परंतु प्रशासनाच्या वतीने काय कार्यवाही झाली माहिती नाही. त्यांची पेन्शन अजूनही सुरू झाली नाही. दरम्यान, त्यांची प्रकृती ठिक नसल्याने ते बेडवरच होते. त्यामुळे याबाबत त्यांना साधी चौकशीही करता आली नाही. त्यांचा प्रस्ताव वीज वितरण कंपनीच्या बल्लारपूर विभागाने वरिष्ठांकडे पाठविला; परंतु त्यात काही त्रुटी असल्याने तो परत आला. त्यानंतर प्रशासनाने नेमके काय केले हे कळायला मार्ग नाही. बापूजी जंपलवार यांनी अनेकवेळा पत्रव्यवहार केला, परंतु वीज वितरण कंपनीने त्यांच्या पेन्शनचे तर सोडाच त्यांच्या पत्राचे साधे उत्तरही दिले नाही.सेवानिवृत्तीनंतर तब्बल सात वर्षांपासून निवृत्तीवेतन मिळत नसल्याने जंपलवार कुटुंबीयांवर आर्थिक संकट ओढावलेले असल्याने उपासमारीची वेळ आली आहे. या प्रकारामुळे त्यांच्या मनात नकारात्मक विचार येऊन त्यांनी दि. २४ मार्च २०२२ रोजी बल्लारपूर विभागाचे कार्यकारी अभियंता यांना पत्र देऊन निवृत्तीवेतनाअभावी माझ्यावर आत्महत्येसारख्या पर्यायाची निवड करण्याची वेळ आपण आणली. त्याला जवाबदार तुम्ही राहाल, अशा आशयाचे पत्र देऊन निवृत्तीवेतन त्वरित सुरू करण्याची विनंती केली. परंतु आज त्याही गोष्टीला दोन महिन्याला कालावधी लोटला; मात्र अधिकाऱ्यांना घाम फुटला नाही. 

बापूजी गणपती जंपलवार यांना निवृत्तीवेतनासाठी तब्बल सात वर्षांपासून वंचित ठेवून वीज वितरण कंपनीने त्यांच्यावर मोठा अन्याय केला आहे. हा अन्याय सहन केला जाणार नाही. याबाबत वरिष्ठांकडे तक्रारी केल्या आहेत. दरम्यान, त्यांच्या जीवितास काही धोका झाल्यास वीज वितरण कंपनी विरोधात मोठे आंदोलन पुकारले जाईल. -रामचंद्र मुसळे, जिल्हा उपाध्यक्ष, ईपीएस-९५ राष्ट्रीय संघर्ष समिती.

 

टॅग्स :mahavitaranमहावितरण