शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बंदी असलेले चोर बिटी बियाण्यांची विक्री जोरात ! कृषी विभागाचे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 14:35 IST

मूल तालुक्यात : शेतकऱ्यांनो सावधान ! बियाण्यांमुळे शेतजमीन होते नापीक

धनराज रामटेके लोकमत न्यूज नेटवर्कमूल : मागील वर्षी अवकाळी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. हे दुःख विसरून आता शेतकरी बांधव येणाऱ्या खरिपाच्या मशागतीच्या कामाला लागला आहे. दरम्यान, शेतीच्या कामासाठी लागणाऱ्या बी-बियाण्यांची खरेदी करून आतापासूनच घरी जमा करत आहेत. मात्र, शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत शासनाची बंदी असलेले चोर बिटी बियाण्यांची विक्री जोरात सुरू असून, याकडे कृषी विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

चोर बिटी (बीजी-३) या कापसाच्या वाणाची लागवड केल्यास शेतजमीन नापीक होते. तसेच मानवाला कॅन्सर होण्याचा धोका संभावतो. त्यामुळे शासनाने या बियाण्यांवर बंदी घातली आहे. मात्र, तेलंगणातून चोरट्या मार्गाने सदर बियाणे जिल्ह्यात आणली जात आहेत. कृषी विभाग मात्र कोणतीही कारवाई करीत नसल्याने या बियाण्यांची खुलेआम विक्री जिल्हाभरात सुरू आहे. मागील काही वर्षापासून शेतकरी कापूस पिकाकडे वळले आहेत. दरवर्षी कापसाचा पेरा वाढत चालला आहे. कापसाच्या पिकात मोठ्या प्रमाणात गवत उगवत असल्याने गवत काढण्यावर शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागतो. हा खर्च कमी करण्यासाठी शेतकरी तणनाशकांची मोठ्या प्रमाणात फवारणी करतात. तणनाशकाची फवारणी केल्यास त्याचा काही प्रमाणात परिणाम संबंधित पिकावरही होतो. मात्र, चोर बिटी या कापसाची लागवड केल्यास तणनाशकाचा काहीच परिणाम पिकावर होत नाही. त्यामुळे चोर बिटीची लागवड करून शेतकरी तणनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणात करतो.

कमी जागेत जास्त उत्पादनाचे आमिषमूल तालुक्यातील बहुतांश लोकांची उपजीविका शेतीवर अवलंबून आहे. तालुक्यातील बेंबाळ, जुनासुर्ला, गडीसुर्ला, नांदगाव या परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड करतात. मात्र, यावर्षी कापसाच्या भावात घसरण झाल्याने शेतकरी मात्र कमालीचे हैराण झाले. त्यामुळे शेतकरी वर्ग कमी जागेत जास्त उत्पादन घेण्याच्या आमिषेपोटी प्रतिबंधित असलेल्या बियाण्यांच्या खरेदीला बळी पडत आहे. त्याचाच फायदा घेत परिसरातील नफाखोर व्यापारी तसेच दलाल घेताना दिसून येत आहेत. मात्र, याबाबत कृषी विभाग मात्र उदासीन असल्याचे दिसून येत आहे.

तणनाशके घातकचअतिशय घातक असलेली तणनाशके वापरली जात असल्याने मानवाला कॅन्सर होतो किंवा त्याचा मृत्यूसुद्धा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने चोर बिटी या बियाण्यांवर बंदी घातली आहे. तेलंगणातही या बियाण्यांवर बंदी आहे. मात्र, तेलंगणा राज्यातून प्रतिबंधित बियाणे चंद्रपूर जिल्ह्यात आणले जात आहेत. याकडे कृषी विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

कृषी अधिकारी व कृषी केंद्र चालकांची मिलीभगतकृषी केंद्रांमध्ये खुलेआम चोर बिटी बियाण्यांची विक्री होत असताना कृषी विभाग कोणतीही कारवाई करीत नाही. यावरून कृषी विभागातील वरिष्ठ अधिकारी व कृषी केंद्र संचालक यांच्यामध्ये मिलीभगत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कृषी विभागाचे अधिकारी एकाही कृषी केंद्रांवर कारवाई करीत नाही. याची पक्की खातरजमा येथील कृषी केंद्र संचालकांना झाली असल्याने चोर बिटी बियाणांचा काळा बाजार वाढला आहे. एकूण लागवडीच्या सुमारे ८० टक्के बियाणे चोर बिटी वापरले जात आहेत. मात्र, कृषी विभाग कोणतीही कारवाई करीत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

८० % कृषी विभागाने बियाणे जप्त करावे बियाणे चोर बिटी वापरले जात आहेत. तेलंगणा राज्यातून प्रतिबंधित असलेले हे बियाणे चंद्रपूर जिल्ह्यात आणले जात आहेत. याकडे कृषी विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरcottonकापूस