शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

घोषणापत्र न दिल्यास बँका परस्पर पीक विमा हप्ता कापणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 23:00 IST

शेतकऱ्यांना खरीप पीक योजनेत सहभागी होण्याची सक्ती टाळायची असल्यास अंतिम मुदतीच्या सात दिवस अगोदर घोषणापत्र द्यावे लागणार आहे. मात्र, घोषणापत्र न दिल्यास बँका परस्पर विमा हप्ता कापणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण होवू शकते.

ठळक मुद्देशेतकऱ्यांमध्ये नाराजीखरीप पीक विम्यासाठी जाचक अट

राजेश मडावीलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : खरीप पीक योजनेत सहभागी होण्यासाठी यंदा अर्ज भरण्याच्या मुदतीला ३१ जुलैनंतर मुदतवाढ मिळण्याची शक्यता नाही. शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होण्याची सक्ती टाळायची असल्यास अंतिम मुदतीच्या सात दिवस अगोदर घोषणापत्र द्यावे लागणार आहे. मात्र, घोषणापत्र न दिल्यास बँका परस्पर विमा हप्ता कापणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण होवू शकते.

यंदाच्या खरीप पीक विमा योजनेतंर्गत भात (तांदुळ) पिकासाठी ४२ हजार ५०० रुपए प्रति हेक्टर विमा संरक्षित रक्कम निश्चित करण्यात आला. शेतकºयांना याकरिता ८५० रुपए प्रतिहेक्टर पीक विमा हप्ता भरावयाचा आहे. सोयाबीनसाठी ४५ हजार रुपए प्रतिहेक्टर विमा संरक्षित रक्कम असून ९०० रुपए प्रतिहेक्टर, मुग उडीद पिकासाठी २० हजार रुपए प्रतिहेक्टर संरक्षित व शेतकऱ्यांचा हप्ता ४०० रुपए प्रतिहेक्टर, तूर पिकासाठी ३५ हजार रुपए प्रतिहेक्टर हप्ता व ७०० रुपए विमा हप्ता आणि कापूस पिकासाठी ४५ हजार रुपए संरक्षित रक्कम व २ हजार २५० रुपए प्रतिहेक्टर विमा हप्ता भरण्याच्या सूचना आहेत. मात्र, शेतकऱ्यांनी घोषणापत्र न दिल्यास सहभाग बंधनकारक असल्याचा निष्कर्ष बँका काढू शकतील. तशी परवागनी शासनाकडूनच बँकांना देण्यात आली आहे.

पीक विमा योजनेत सहभाग घेण्याची इच्छा नसली तरी केवळ घोषणापत्र दिले नाही म्हणून अशा शेतकऱ्यांचा विमा हप्ता परस्पर त्यांच्या कर्ज रकमेतून कापून घेण्याचा अधिकार बँकांना मिळाला आहे. घोषणापत्र न देणाऱ्या शेतकऱ्यांने हप्ता कपात झाल्याची तक्रार केल्यास विचारात घेतली जाणार नाही.घोषणापत्राआडून विम्याची सक्तीविमा योजनेत सहभागी होण्यासाठी २८ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. कर्जदार शेतकऱ्यांसाठी विमा योजना आधी सक्तीची असल्याने कोट्यवधी रूपयांचा विमा हप्ता कंपन्यांच्या घशात जात होता. आता ही योजना ऐच्छिक झाली. परंतु, शेतकऱ्यांसाठी घोषणापत्राची अट टाकण्यात आली आहे. त्यामुळे घोषणापत्र न देणाऱ्या शेतकऱ्यांसाठी विमा योजना एकप्रकारे सक्तीचीच असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे.शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभागी न होण्याबाबतचे घोषणापत्र हंगामाच्या आधी किंवा योजनेत सहभागी होण्याच्या अंतिम मुदतीच्या सात दिवस अगोदर देणे अपेक्षित आहे. जे शेतकरी स्वत:च्या स्वाक्षरीसह योजनेत सहभागी न होण्याबाबत घोषणापत्र देणार नाहीत. अशा सर्व शेतकऱ्यांचा योजनेत सहभाग बंधनकारक समजला जाईल, असे निर्देश आहेत.-डॉ. उदय पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर

टॅग्स :Farmerशेतकरीbankबँक