शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बंजारा समाजाने उत्कर्ष साधावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 23:22 IST

महाराष्ट्र ही संतांची पावन भूमी आहे. या भूमीतून निपजलेले अनेक महापुरूष व थोर महात्म्यांनी या संत महात्मांचा उपदेश आणि विचारातून पे्ररणा घेत असामान्य कर्तृत्व गाजवले आहे.

ठळक मुद्देहंसराज अहीर : परमडोली टोला येथे सेवालाल महाराज जयंती सोहळा

आॅनलाईन लोकमतजिवती : महाराष्ट्र ही संतांची पावन भूमी आहे. या भूमीतून निपजलेले अनेक महापुरूष व थोर महात्म्यांनी या संत महात्मांचा उपदेश आणि विचारातून पे्ररणा घेत असामान्य कर्तृत्व गाजवले आहे. मानवतेच्या धर्माचे पालन करीत लोकसेवा केली आहे. संतांचे विचार मानवी उत्कर्षासाठी सदैव कल्याणकारी ठरले आहेत. संत सेवालाल महाराज यांनीही याच विचारांचा पुरस्कार केला. त्यामुळे बंजारा समाजबांधवाने विविध क्षेत्रामध्ये पुढे येण्याचे प्रयत्न करावे, असे आवाहन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.जिवती तालुक्यातील परमडोली तांडा येथे श्री संत सेवालाल महाराज यांच्या जयंती कार्यक्रम मंगळवारी पार पडला. यावेळी ते बोलत होते. यावेळी बंजारा समाजाचे प्रेम सिंह महाराज, भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, किसान आघाडीचे महासचिव राजू घरोटे, भाजपाचे विधानसभा विस्तारक सतीश दांडगे, जि. प. सभापती गोदावरी केंद्रे, पं. स. सभापती सुनील मडावी, पं. स. उपसभापती महेश देवकते, जि. प. सदस्य कमलाबाई राठोड, भाजप तालुका अध्यक्ष केशव गिरमाजी, तेलंगनाचे अब्दुल कलाम, सुरेश केंद्रे, गोंविद नाईक, उत्तम राठोड, दत्ता राठोड, गोपीनाथ चव्हाण, सरपंच लक्ष्मण कांबळे, उपसरपंच ईश्वर आडे, चंदु पवार, वामन पवार आदींची उपस्थिती होती.ना. अहीर पुढे म्हणाले, भारतीय संस्कृती, परंपरा व उदांत्त विचारांचा वारसा जोपासणारा समाज म्हणून बंजारा बांधवांकडे पाहण्यात येते. मात्र दुदैवाने हा समाज विकासापासून वंचित आहे. भाजप नेतृत्वातील केंद्र व राज्य सरकारने विविध कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. त्या योजनांचा लाभ या समाजातील बांधवांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.त्यानंतर उपसभापती महेश देवकते, अब्दुल कलाम, उपसरपंच ईश्वर आडे यांनी उपस्थित नागरिकांना संबोधित केले. या कार्यक्रमाला जिवती तालुक्यासह तेलंगणा राज्यातील बहुसंख्य समाजबांधव उपस्थित होते.