शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
4
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
5
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
6
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
7
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
8
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
9
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
10
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
11
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
12
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
13
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
14
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
15
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
16
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
17
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
18
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
19
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
20
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी

उखडलेल्या रस्त्यांवर सहा कोटींची ‘मलमपट्टी’

By admin | Updated: October 30, 2014 22:49 IST

औद्योगिक तालुका म्हणून प्रसिद्ध असलेल्या कोरपना तालुक्यांतील रस्त्यांची अवस्था सध्या बिकट आहे. यामुळे दिवसागणिक अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या अपघातात अनेकांना आपला

लखमापूर: औद्योगिक तालुका म्हणून प्रसिद्ध असलेल्या कोरपना तालुक्यांतील रस्त्यांची अवस्था सध्या बिकट आहे. यामुळे दिवसागणिक अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या अपघातात अनेकांना आपला जीवही गमवावा लागत आहे. या रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी तब्बल सहा कोटी रुपये खर्च करण्यात आले. मात्र रस्त्यांची अवस्था आजही गंभीर आहे. त्यामुळे मलमपट्टीवर खर्च करण्यात आलेला पैसा गेला तरी कुठे असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत आहे.कोरपना तालुक्यात सन २०१०-११ पासून तर, आजतागायत रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी सहा कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. कोट्यवधी रुपये खर्च करूनही रस्त्याची अवस्था जैसे थे आहे. गडचांदूर, सोनुर्ली, वनसडी या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी यापूर्वी १ कोटी १९ लाख रुपयाचा निधी प्राप्त झाला. त्यानंतर रस्त्याची थातूरमातूर डागडुजी करून कामपूर्ण झाल्याचा देखावा करण्यात आला. अल्पावधीतच रस्त्यावर पुन्हा खड्डे पडले. आता हेच खड्डे अपघाताला आमंत्रण देत आहेत. कन्हाळगाव, पारडी, चनई, मांडवा, वनसडी, पकडीगुड्डम, पिपर्डा, कुसळ, धानोली, येरगव्हाण, वनोजा, नारंडा, भोयेगाव आदी रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी मोठ्या प्र्रमाणात खर्च करण्यात आला. यातील अनेक रस्त्यांची दुरुस्ती झाली नसतानाही कागदोपत्री रस्त्यांची दुरुस्ती दाखवून बिल उचलण्यात आल्याचे समजते.कोरपना, कोडशी, हेटी, कोरपना, तांबडी, कोडशी मार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी प्रशासनाची परवानगी न घेता अवैधरित्या उत्खनन करून रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले. यातही अर्धवट काम केल्याने याही रस्त्यावरून जाताना नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मागील काही वर्षामध्ये बांधकाम विभागाला रस्त्याची डागडुजी, दुरुस्ती आणि रस्त्याच्या कडेला असलेले झुडपे तोडण्यासाठी जवळपास सहा कोटी रुपयाचा निधी प्राप्त झाला. या निधीतून रस्ते चकचकीत नाही पण किमान खड्डे बुजविणे अपेक्षित होते. मात्र रस्त्यावरील खड्डे काही कमी झाले नाही. गडचांदूर, वनसडी, कोरपना हा मुख्य मार्ग समोर आंध्रप्रदेशातील आदिलाबादकडे जातो. या मार्गावर अनेकवेळा अपघात झाले आहे. वाहनांची सारखी वर्दळ असते. यातच वनसडी, सोनुर्लीजवळ रस्त्याचे कठडे उघडे पडले आहे.त्यामुळे या रस्त्यावर अपघातांची संख्या वाढली आहे. गडचांदूर-नांदाफाटा मुख्य मार्गावरही रस्त्यावर खड्डे पडले आहे. काही दिवसापूर्वी बांधकाम विभागाने मुरूम टाकून खड्डे बुजविण्याचा प्र्रयत्न केला. मात्र दोन-चार दिवसात पुन्हा खड्डे उघडे पडले आहे. या रस्त्यांच्या बांधकामाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसचे आबिद अली यांच्यासह परिसरातील नागरिकांनी केली आहे.(वार्ताहर)