सत्यशोधक समाजाची मागणी : हल्लेखोरामागे विघातक शक्ती असल्याचा आरोपलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राष्ट्रीय प्रबोधनकार सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराज किर्तनाच्या माध्यमातून जनजागृती करतात. अंधश्रद्धा आणि वाईट चालीरितीवर प्रवाह करतात. त्यांच्या भजनाची शैली संत तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज यांच्या पद्धतीची आहे. ते दारूबंदीचाही प्रचार करतात परंतु त्याचे जनजागृतीचे कार्य समाजकंटकांना सहन होत नाही. यातूनच त्यांच्यावर हल्ला झाला असून महाराजांवर हल्ला करणाऱ्या संघटनेवर कायमस्वरूपी बंदी घालावी, अशी मागणी सत्यशोधक समाजाने केली आहे.ते मुंबई येथे कीर्तनाचा कार्यक्रम आटोपून कार्यकर्त्याशी बोलत असताना एका दारुड्या माथेफिरूने त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यापूर्वी देखील त्यांच्यावर हल्ले करण्यात आले होते. त्यांच्या कीर्तनात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. परंतु ते कधीही डगमगले नाहीत. सत्यपाल महाराज यांच्यावरील हल्ला एका दारुड्याने केला, असे समजण्याचे कारण नाही. यांच्या पाठीमागे विध्वंसक शक्ती आहेत. या शक्तीनी डॉ.नरेंद्र दाभोळकर, कॉ. पानसरे, प्रा.कुलबुर्गी यांचे खून केले. त्याच विध्वसंक शक्ती सत्यपाल महाराजावरील चाकू हल्ल्याच्या पाठीमागे असण्याची दाट शक्यता आहे. शासनाने त्या शक्तीस्रोतांचा शोध घेवून त्या संघटनेवर बंदी घालावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून सत्यशोधक समाजाचे जिल्हाध्यक्ष हिराचंद बोरकुटे, सूर्यभान झाडे, डी.के. आरीकर, रामकुमार आकापल्लीवार, राजेश सोलापन, किशोर पोतनवार, अंकुश वाघमारे, शैख मैकू शेख शहाबुद्दीन, डॉ. राकेश गावतुरे, प्रा. माधव गुरुनुले, एच.बी. पटले, मांदाडे, जहीर काझी, अनिल देठे, पुरुषोत्तम चौधरी यांनी केली आहे.
सत्यपाल महाराजांवर हल्ला करणाऱ्या संघटनेवर बंदी घाला
By admin | Updated: May 23, 2017 00:31 IST