शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूरसह मुंबई, पुणे व नागपुरात यंदा बांबूच्या राख्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 15:12 IST

बहिण-भावाच्या पवित्र नात्याला घट्ट बांधण्यासाठी यंदा पहिल्यांदाच बाजारपेठेत अनोख्या म्हणजे बांबूपासून तयार करण्यात आलेल्या राख्या नवे आकर्षण ठरणार आहेत. यावर्षी या राख्या चंद्रपूरसह मुंबई, पुणे, व नागपूर या महानगरात उपलब्ध होणार आहे. ही यावर्षीच्या रक्षाबंधनाला चंद्रपूर येथील बांबू रिसर्च व ट्रेनिंग सेंटर (बीआरटीसी)कडून आगळीवेगळी भेटच ठरणार आहे.

ठळक मुद्दे५० हजार राख्यांचे उद्दिष्ट्यरक्षाबंधनाला चंद्रपूर बीआरटीसीची अनोखी भेट

राजेश भोजेकरलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : बहिण-भावाचे नाते घट्ट बांधून ठेवणारा रक्षाबंधन सण तोंडावर आहे. भावासाठी बहिण आधीच राखीचा बेत ठरवून ठेवतात. बहिण-भावाच्या पवित्र नात्याला घट्ट बांधण्यासाठी यंदा पहिल्यांदाच बाजारपेठेत अनोख्या म्हणजे बांबूपासून तयार करण्यात आलेल्या राख्या नवे आकर्षण ठरणार आहेत. यावर्षी या राख्या चंद्रपूरसह मुंबई, पुणे, व नागपूर या महानगरात उपलब्ध होणार आहे. ही यावर्षीच्या रक्षाबंधनाला चंद्रपूर येथील बांबू रिसर्च व ट्रेनिंग सेंटर (बीआरटीसी)कडून आगळीवेगळी भेटच ठरणार आहे.चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बांबू उत्पादन होते. बांबूवर आधारित उद्योग असावा. त्यापासून चंद्रपूर जिल्ह्यातीलच नव्हे, तर राज्यातील विविध भागात नव्या रोजगाराची निर्मिती व्हावी, या उद्दात्त हेतूने राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यात चिचपल्ली येथे बांबू रिसर्च व ट्रेनिंग सेंटरची स्थापना केली. हे केंद्र सुरू झाल्यापासून हजारो हातांना काम मिळाले. बांबूपासून घराच्या दिवाणखाण्यापासून तर कार्यालयात शोभून दिसेल अशा वस्तूंची निर्मिती सुरू झाली. आता या केंद्राने एक पाऊल पुढे टाकत यावर्षीपासून बांबूपासून चक्क राख्या बनविण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्र बांबू विकास महामंडळ आणि बांबू रिसर्च व ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून कामही सुरू आहे. या केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या चार प्रशिक्षण केंद्रात १३० महिला मागील १५ दिवसांपासून या राख्या बनविण्याचे काम युद्धपातळीवर करीत आहेत. आतापर्यंत २० हजार राख्या तयार झाल्याअसून मागणी पूर्ण करण्याच्या अनुषंगाने २० आॅगस्टपर्यंत ५० हजार राख्यांचे उद्दिष्ट्य निश्चित करण्यात आले आहे, अशी माहिती पर्यवेक्षिका योगिता साठवणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.मुंबई, पुणे व नागपुरातून मागणीबांबूपासून राखी निर्मितीची कल्पनाच नाविन्यपूर्ण होती. ही कल्पना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनाही आवडली. या राख्यांना राज्यात मोठी मागणी आहे. पहिले वर्ष असल्यामुळे चंद्रपूर, मुंबई, पुणे व नागपूर या महानगरात या राख्या पाठविण्यात येणार असल्याचे बांबू रिसर्च अ‍ॅन्ड ट्रेनिंग सेंटरचे संचालक राहुल पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले.वनमंत्र्यांना आज राखी बांधून होणार भुभारंभबांबूपासून बनविलेल्या राख्यांबाबत सर्वत्र कुतुहल निर्माण झाले आहे. ही राखी सर्वप्रथम मंगळवार दि. १४ आॅगस्टला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना बांधून या नवोपक्रमाचा शुभारंभ बल्लारपूर येथून करण्यात येणार आहे. यानंतर या राख्या मागणी असलेल्या बाजारपेठेत पाठविण्यात येणार आहे.

टॅग्स :Rakhiराखी