शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बांबू कलेतून जिल्हा रोजगाराभिमुख होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 22:53 IST

राज्यातील पश्चिम महाराष्ट्र उसाच्या शेतीमुळे प्रगत झाले. त्याच धर्तीवर विदर्भातील शेतीचे अर्थशास्त्र बांबू लागवडीतून उन्नत करण्याचा प्रयत्न आहे. यासाठी मनरेगाचे सहकार्य घेतले जाईल. बांबू कलेचे प्रशिक्षण देण्यासाठी विविध ठिकाणी केंद्र सुरू करण्याचा संकल्प आहे. यामुळे महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : विसापूर येथे ‘भाऊ’ प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : राज्यातील पश्चिम महाराष्ट्र उसाच्या शेतीमुळे प्रगत झाले. त्याच धर्तीवर विदर्भातील शेतीचे अर्थशास्त्र बांबू लागवडीतून उन्नत करण्याचा प्रयत्न आहे. यासाठी मनरेगाचे सहकार्य घेतले जाईल. बांबू कलेचे प्रशिक्षण देण्यासाठी विविध ठिकाणी केंद्र सुरू करण्याचा संकल्प आहे. यामुळे महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे. महिला शक्तीच्या पाठीमागे खंबीर उभा असून बांबू कला प्रशिक्षणातून जिल्हा रोजगाराभिमुख करण्याचा संकल्प राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी विसापूर येथे ‘भाऊ’ प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केला.बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली अंतर्गत बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथे बीपीएड कॉलेज मार्गावर बांबू हॅन्डीक्राफ्ट व आर्ट युनिट अर्थात भाऊ प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले. यावेळी नामदार मुनगंटीवार बोलत होते.याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, आमदार नाना श्यामकुळे, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळ, चंद्रपूरच्या महापौर अंजली घोटेकर, भाजपाचे तालुका अध्यक्ष किशोर पंदीलवार, महाराष्ट्र बांबू विकास मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक टी. एस. के. रेड्डी, एफडीसीएमचे महाव्यवस्थापक ऋषिकेश रंजन, चंद्रपूर वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक एस. व्ही. रामाराव, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, पंचायत समितीचे सभापती गोविंदा पोडे, विसापूरच्या सरपंच रिता जिलटे, जि. प. सदस्य हरिश गेडाम, वैशाली बुद्धलवार, गौतम निमगडे, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक राहूल पाटील आदींची उपस्थिती होती.चिचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राची प्रसार माध्यमाने सिंगापूरपर्यंत पोहचविली. बांबू कला जगात प्रसिद्धीला येत आहे. बांबू कलेतून तयार साहित्यांना बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाणार आहे. आकर्षक वस्तूंनी अनेकांना भुरळ पाडली आहे. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना सामान्याचे जीवनमान उंचावणाऱ्या असून लाभान्वितांना मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील लाखांवर कुटुंबांना अन्न सुरक्षा योजनेतून धान्य देण्याचा प्रयत्न असून कोणीही उपासी राहणार नाही, अशी व्यवस्था केली जात असल्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.विजय टोंगे व किशोर पंदीलवार यांना बांबू रोपटे प्रदान करून शेती उन्नत करण्याचा मार्ग दाखविला. महिला बचत गटांना टूल किटचे वाटप देखील करण्यात आले.