शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
2
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
3
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
4
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
5
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
6
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
7
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
8
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
9
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
10
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
11
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
12
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
13
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
14
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
15
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
16
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
17
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
18
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
19
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
20
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल

बल्लारपुरातून १० लाखांचा कागद घेऊन दिल्लीला गेलेला ट्रक बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 09:36 IST

बल्लारपूर पेपर मिलमधून आठ दिवसांपूर्वी ९ लाख ९५ हजार रुपये किमतीचे कागद घेऊन दिल्लीकडे निघालेला ट्रक गंतव्यस्थळी पोहचलाच नाही.

ठळक मुद्देपेपरमिलची घटनाट्रान्सपोर्ट मालकाची पोलिसांकडे धाव

आॅनलाईन लोकमतबल्लारपूर : बल्लारपूर पेपर मिलमधून आठ दिवसांपूर्वी ९ लाख ९५ हजार रुपये किमतीचे कागद घेऊन दिल्लीकडे निघालेला ट्रक गंतव्यस्थळी पोहचलाच नाही. ट्रकमालकही उडवाउडवीची उत्तरे देत आहे. अशी तक्रार कार्तिक ट्रान्सपोर्ट संचालक सुनील तुकाराम टेकाम (३९) रा. बालाजी वॉर्ड, बल्लारपूर यांनी पोलिसात केली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.तक्रारीनुसार, ११ नोव्हेंबरला सकाळी ट्रान्सपोर्ट संचालक सुनील टेकाम यांच्याकडे एक अनोळखी इसम ट्रक घेऊन आला. त्याने आपण आपण या ट्रकचा चालक असून राजस्थानला काही माल पाठवायचा असेल तर सांगा, असे तो म्हणाला. टेकाम यांनी आपल्याशी संबंधित व्यवसायिकाशी संपर्क केला असता राजस्थान नाही पण, दिल्लीला पेपर मिलमधून पेपर न्यायचे आहे, असे कळले. टेकाम यांनी सदर ट्रक चालकाला त्यांच्याकडे पाठविले. सोबत डिझेलकरिता १४ हजार ४०० व कामाची अग्रीम रक्कम म्हणून १० हजार रुपये सोबत दिले. पेपर मिलमधून ९ लाख ९५ हजार रुपये किमतीचे कागद घेऊन ट्रक येथून रवाना झाला. हे कागद माणिसार (दिल्ली) येथील शैलेजा पेपर मार्टला द्यायचे होते. परंतु कागद तेथपर्यंत पोहचलेच नाही. त्या ट्रक चालकाने आपल्या ट्रकचा मालक म्हणून ज्याचे नाव सांगितले त्याच्याशी टेकाम यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधला पण, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. टेकाम यांनी दिल्ली मार्गावरील टोलनाक्यांवर ट्रकचा क्रमांक सांगून विचारपूस केली. मात्र काहीही हाती लागले नाही. अखेर हताश होऊन टेकाम यांनी बल्लारपूर पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार नोंदविली. पोलिसांनी आरोपींवरुद्ध कलम ४०६ (३४) व ४२० (३४) या अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पो.नि. प्रदीप शिरस्कर यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक गोखरे व संजय गंधेवार हे तपास करीत आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हा