शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती चितपट होणार? निकालाची उत्सुकता शिगेला
3
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
4
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
5
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
6
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
7
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
8
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
9
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
10
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
11
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
12
Indian Railway: आता रेल्वेतही विमानासारखा नियम; ‘जादा' सामान बाळगल्यास दंड!
13
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
14
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
15
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
17
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
18
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
19
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
20
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?

सीएम चषक नोंदणीत बल्लारपूर राज्यात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 22:19 IST

युवकांमधील कला, क्रीडा या सुप्त गुणांना चालना मिळावी, यासाठी बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात सीएम चषक स्पर्धा घेण्यात आली. तरूणाईने दिलेला उदंड प्रतिसाद उल्लेखनीय आहे. बल्लारपूर विधानसभा क्षेत्र नोंदणीमध्ये राज्यात अव्वल ठरले. या विभागाचा लोकप्रतिनिधी म्हणून माझ्यासाठी अभिमानाची बाब असून पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या परिश्रमाचे फलित असल्याचे प्रतिपादन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : बल्लारपूर विधानसभा क्षेत्राअंतर्गत विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : युवकांमधील कला, क्रीडा या सुप्त गुणांना चालना मिळावी, यासाठी बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात सीएम चषक स्पर्धा घेण्यात आली. तरूणाईने दिलेला उदंड प्रतिसाद उल्लेखनीय आहे. बल्लारपूर विधानसभा क्षेत्र नोंदणीमध्ये राज्यात अव्वल ठरले. या विभागाचा लोकप्रतिनिधी म्हणून माझ्यासाठी अभिमानाची बाब असून पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या परिश्रमाचे फलित असल्याचे प्रतिपादन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.एकदंत लॉनमध्ये झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, प्रमोद कडू, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, आमदार रामदास आंबटकर, बल्लारपूर नगराध्यक्ष हरिश शर्मा, महापौर अंजली घोटेकर, जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे, काशीसिंह, शिवचंद द्विवेदी, निलेश खरबडे, रेणुका दुधे यांची उपस्थिती होती.यावेळी सीएम चषक स्पर्धेत बल्लारपूर विधानसभा क्षेत्राअंतर्गत चंद्रपूर, बल्लारपूर, पोंभुर्णा व मुल तालुका स्तरावर घेण्यात आलेल्या विविध क्रिडा स्पर्धांमधील विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी रांगोळी, चित्रकला, गीत गायन व नृत्य स्पर्धा झाली.परीक्षण डॉ. जयश्री कापसे, मनीषा बोनगीरवार-पडगीलवार, सुशिल सहारे यांनी केले. रांगोळी स्पर्धेत सुहास दुधलकर प्रथम, गीत गायन स्पर्धेत ऊर्जानगरची समृद्धी इंगळे प्रथम, प्रशांत शामकुंवर यांना द्वितीय, कुमुद रायपुरे यांना तृतीय तर विक्की दुपारे व नम्रता श्रीरामे यांना प्रोत्साहनपर, समुह नृत्य स्पर्धेत आरडी ग्रुप बल्लारपूर यांना प्रथम, नवरंग डान्ॅस ग्रुप बल्लारपूर यांना द्वितीय, धारवी ग्रुप पोंभुर्णा यांना तृतीय तर जय भवानी ग्रुप व सातारा भोसले ग्रुप यांना प्रोत्साहनपर देण्यात आला.एकल नृत्य स्पर्धेत प्रियंका कोरे प्रथम, प्रेरणा सोनारकर द्वितीय, शितल कुमरे तृतीय, चित्रकला स्पर्धेत अ गटात वंशिता मुलचंदानी प्रथम, प्रियांशु पांडे द्वितीय, खुशी उमरे तृतीय, चित्रकला स्पर्धेत ब गटात सुदर्शन बारापात्रे प्रथम, गरिमा गुप्ता बल्लारपूर द्वितीय, शुभम येवतकर मुल तृतीय आदींना देण्यात आला. संचालन प्रज्वलंत कडू यांनी केले. अ‍ॅड. रणंजयसिंह, सुरज पेदुलवार आदींसह अन्य सहकारी उपस्थित होते.