शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

बल्लारपूर बसस्थानक बनले ‘सेल्फी’स्थळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 23:53 IST

बल्लारपुरातील नवीन बसस्थानक स्थळ तेथील भव्यता आणि देखणेपणा, यामुळे साऱ्यांच्याच आकर्षणाचे केंद्र बनले आहे. सोबतच, सेल्फी काढणाऱ्यांचे आवडीचे स्थानही झाले आहे.

ठळक मुद्देलोकार्पणाआधीच सेल्फी काढणाऱ्यांची गर्दी

वसंत खेडेकर।लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : बल्लारपुरातील नवीन बसस्थानक स्थळ तेथील भव्यता आणि देखणेपणा, यामुळे साऱ्यांच्याच आकर्षणाचे केंद्र बनले आहे. सोबतच, सेल्फी काढणाऱ्यांचे आवडीचे स्थानही झाले आहे.डोळ्यात सामावू शकणार नाही, एवढी भव्य आणि प्रशस्त इमारत, त्यावरील आकर्षक रंगसंगतीमय रंगोटी, नयनरम्यता आणि चकचकीतपणा, आत सर्वत्र मनमोहक सजावट आणि भिंतीवर वन्यप्राण्यांची मनोहारी चित्र, प्रवाशांना बसण्याकरिता स्टीलचे मोठ्या संख्येतील चकचकीत बेंचेस आणि बसेस उभे राहण्याकरिता सोयीची फलाट हे वर्णन आहे.बल्लारपुरातील बदललेल्या बसस्थानकाने या बसस्थानकाला आता बसस्थानक म्हणावे की एअर पोर्ट असा संभ्रम निर्माण व्हावा अशी ही इमारत हायफाय झाली आहे. ती चर्चेचा विषय ठरली आहे. आता, अशा स्थळावर सेल्फी काढण्याचा मोह न झाला, तर नवल! बसस्थानक पूर्णत: तयार झाले आहे. त्याचे लोकार्पण होणे तेवढे बाकी आहे. परंतु, त्या आधीच हे चकचकीत बसस्थानक बघणाºयांची व बसस्थानकातील विविध भागात उभे राहून सेल्फी काढणाºयाची रिघ लागली आहे. सेल्फी काढणाºयात महाविद्यलयीन मुला-मुलींचा भरणा अधिक दिसून येतो. बल्लारपूर शहरात पहिले नाममात्र बसस्थानक (फक्त एक शेड) राजेंद्र प्रा. शाळेजवळ रोडला लागून होते. शहरात मध्यभागी, सोययुक्त बसस्थानक व्हावे, याकरिता प्रयत्न झाले. तत्कालीन नगराध्यक्ष जैनुद्दीन जव्हेरी यांच्या पुढाकाराने, या जागेची बसस्थानकारिता निवड करून तेथे बसस्थानक १९८६ ला झाले. गतवर्षी त्याचे भूमिपूजन झाले व नवीन इमारत आकाराला आली असून ती आकर्षणाचे केंद्र बनले आहे. या इमारतीकडे बघितल्यावर क्षणभर डोळे भरून पाहण्याचा मोह आवरत नाही.