शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा करा, अशी मागणी शासनाकडे शेतकरी करीत आहे. तालुक्यातील शेतकरी रात्रभर विजेच्या प्रतीक्षेत जागत आहे. लोकप्रतिनिधींनी आवाज उठवून न्याय मिळवून द्यावा, अशी अपेक्षा बळिराजा बाळगत आहे. भारनियमामुळे परिसरात शेतीसाठी एक आठवडा रात्री, तर एक आठवडा दिवसा वीजपुरवठा केला जात आहे. रात्रीच्या वेळी शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी त्याच्या छातीत धडधड सुरू होते. रात्रीच्या वेळी त्याच्यासह अख्खे कुटुंब रात्र कशी जाईल, या चिंतेत असते. रात्रीला केवळ विजेची भीती नाही, तर वन्यप्राण्यांसोबतही संघर्ष सुरू असतो. शासनाने ही चेष्टा थांबवून शेतीसाठी संपूर्ण हंगामात तांत्रिक अडचणी दूर करून अधिक दाबाने दिवसाचाच वीज पुरवठा करावा, अशी मागणी ब्रह्मपुरी तालुक्यातील बळिराजा करीत आहे.
विजेच्या प्रतीक्षेत बळिराजाची रात्र शेतावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:31 IST