शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
3
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
4
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
5
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
6
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
7
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
8
आयोग नव्हे, मतदारच राजा !
9
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
10
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
11
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
12
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
13
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
14
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
15
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
16
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
17
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
18
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
19
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
20
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई

कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक : प्रस्थापितांना मोठे धक्के; गोंडपिपरी भाजप, पोंभूर्णा काँग्रेसकडे 

By साईनाथ कुचनकार | Updated: April 30, 2023 23:26 IST

भद्रावती शिवसेना ठाकरे गटाकडे

चंद्रपूर : जिल्ह्यातील बारापैकी भद्रावती, गोंडपिपरी आणि पोंभूर्णा कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी रविवारी मतदान घेण्यात आले, त्यानंतर लगेच निकालही घोषित करण्यात आला. या बाजार समितीमध्ये दिग्गजांची वर्चस्वासाठी लढाई होती. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष  या निवडणुकीकडे लागले होते. पोंभूर्णा कृषी उत्पन बाजार समितीमध्ये काँग्रेस, गोंडपिपरी बाजार समितीमध्ये भाजप तर भद्रावतीमध्ये शिवसेना ठाकरे गटाने या निवडणुकीमध्ये बाजी मारली.

गोंडपिपरी काँग्रेसची तर पोंभूर्णामध्ये भाजपची सत्ता यावेळी मतदारांनी उलथवून लावली. गोंडपिपरीमध्ये बाजार समितीच्या स्थापनेपासून काँग्रेस सत्तेत होती. मात्र, यावेळी पहिल्यांदाच भाजपने या बाजार समितीवर विजय मिळविला.  पोंभूर्णामध्ये भाजपकडे सत्ता होती. यावेळी काँग्रेसने या बाजार समितीवर झेंडा फडकविला. निकालानंतर विजयी उमेदवारांनी विजयी मिरवणूक काढली.  गोंडपिपरीत सत्ता मिळताच माजी केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी विजयी उमेदवारांना पेढे भरविले.  भद्रावतीत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे रवींद्र शिंदे यांच्या नेतृत्वात शेतकरी सहकार पॅनलने बाजार समितीमध्ये विजय मिळविला.

पोंभूर्णा येथील विजयी उमेदवारशेतकरी महाविकास आघाडी समर्थित उमेदवार-रवींद्र मरपल्लीवार, विनोद थेरे, प्रवीण पिदुरकर, वसंत पोटे, विलास मोगकार, प्रफुल लांडे, अशोक साखलवार, भारती बदन, सुनंदा गोहणे, वासुदेव पाल, आशिष कावटवार, विनायक बुरांडे.भाजपा समर्थित शेतकरी विकास आघाडी पॅनल-शैलेश चिंचोलकर, नितेश पावडे, रवींद्र गेडाम, धनराज सातपुते, सुनील कटकमवार, राकेश गव्हारे.गोंडपिपरी येथील विजयी उमेदवारभाजपचे विजयी उमेदवार -संदीप पौरकार, समीर निमगडे, चंद्रजित गव्हारे, विजय पेरकावार, सुहास माडुरवाररितेश वेगिणवार, स्वप्नील अनमूलवार, नीलेश पुलगमकर, संजना अम्मावार, गणपती चौधरी, इंद्रपाल धुडसे.काँग्रेस गट विजयी उमेदवारदेविदास सातपुते, नीलेश संगमवार, अशोक रेचनकर, संतोष बंडावार, प्रमिला चनेकरराष्ट्रवादी विजयी सेवा सहकारी भाजप आघाडी सोबत लढले-विजयी महेंद्रसिंह चंदेल.भद्रावतीतील विजयी उमेदवारशेतकरी सहकार पॅनलचे विजयी उमेदवारमनोहर आगलावे, गजानन उताने, विनोद घुगुल, शरद जांभूळकर, ज्ञानेश्वर डुकरे, भास्कर ताजने, कान्होबा तिखट, आश्लेषा जिवतोडे, शांता रासेकर, परमेश्वर ताजने, शामदेव कापटे, अविरोध आलेले मोहन भुक्या.काँग्रेस समर्थित शेतकरी विकास पॅनलराजेंद्र डोंगे, प्रविण बांदूरकर, अतुल जीवतोडे, भानुदास गायकवाड, अनिल चौधरी, राजू आसुटकरपावसाचा मतदारांना फटकारविवारी दिवसभर ढगाळी वातावरण होते. त्यातच मध्येमध्ये पाऊस कोसळत होता. त्यामुळे मतदारांना त्रास झाला.रात्री उशिरापर्यंत चालली मतमोजणीमतदान तसेच निकाल एकाच दिवशी असल्याने प्रशासनाची थोडी धांदल झाली. त्यातच पावसामुळे मतमोजणी करण्यास थोडाफार उशिर झाला.