शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

रक्तदानाच्या उपक्रमातून बाबूजींना आदरांजली

By admin | Updated: July 3, 2016 00:48 IST

लोकमत वृतपत्राचे संस्थापक-संपादक तसेच ज्येष्ठ स्वातंत्र संग्राम सेनानी स्व. जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांची ९३ वी जयंती रक्तदान शिबिराच्या ....

३० जणांचे रक्तदान : लोकमत व लाईफलाईन ब्लड बँक कॅम्पोनेट अप्रायसेस सेंटरचा संयुक्त उपक्रमचंद्रपूर : लोकमत वृतपत्राचे संस्थापक-संपादक तसेच ज्येष्ठ स्वातंत्र संग्राम सेनानी स्व. जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांची ९३ वी जयंती रक्तदान शिबिराच्या सामाजिक उपक्रमातून पार पडली. चंद्रपूर लोकमत जिल्हा कार्यालयाच्या वतीने स्थानिक शामाप्रसाद मुखर्जी वाचनालयाच्या सभागृहात सकाळी १० ते ५ या वेळेत पार पडलेल्या या शिबिरात ३० रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बीआयटीचे अध्यक्ष अ‍ॅड. बाबासाहेब वासाडे तर प्रमुख पाहुणे लोकमत परिवारातील ज्येष्ठ सदस्य डॉ. अशोक बोथरा, सहाय्यक शाखा व्यवस्थापक विनोद बुले, आशा अ‍ॅडव्हटाईज एजंसीचे संचालक प्रसन्ना बोथरा, लोकमत जिल्हा प्रतिनिधी गोपालकृष्ण मांडवकर, लोकमत समाचार जिल्हा प्रतिनिधी अरुणकुमार सहाय उपस्थित होते. यावेळी बोलताना अ‍ॅड. बाबासाहेब वासाडे म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्य संग्राम सेनानी व स्वातंत्र्योत्तर काळात समाजासाठी दिशादर्शक ठरणाऱ्या लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक-संपादक असा बाबूजींच्या आयुष्याचा प्रवास नवी संजिवनी देणारा आहे. मंत्रीपदाच्या काळात त्यांनी घेतलेले निर्णय महत्वपूर्ण ठरले. त्यांनी घालून दिलेल्या आर्दशाच्या वाटेवरून आज लोकमतचा प्रवास सुरु आहे.डॉ. अशोक बोथरा यांनीही याप्रसंगी समयोचित मार्गदर्शन केले. प्रारंभी बाबुजींच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरूवात झाली. प्रास्ताविकातून गोपालकृष्ण मांडवकर यांनी बाबुजींच्या जीवनकार्याची माहिती देवून रक्तदान शिबिरामागील हेतू विषद केला. संचलन आणि उपस्थितांचे आभार लोकमत सखी मंच जिल्हा संयोजिका पूजा ठाकरे यांनी मानले.सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत चाललेल्या या शिबिरात नागरिकांनी आणि युवकांनी स्वत:हून सहभागी होऊन रक्तदान केले. रक्तदानाने साजरा केला राजेंद्र उत्तरवारांनी वाढदिवसशहरातील राजेंद्र उत्तरवार यांनी आज आपला वाढदिवस लोकमतच्या शिबिरात स्वेच्छा रक्तदान करून साजरा केला. ‘लोकमत’मधील वृत्त वाचून ते स्वत:हून शिबिरात पोहोचले. शहरातील अनेक नामाकिंत व्यक्तींनीही यावेळी रक्तदान केले. संजय वैद्य यांचे नव्वदावे रक्तदान नगरसेवक आणि चंद्रपूर नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष संजय वैद्य यांनीही यावेळी रक्तदान केले. हे त्यांचे नव्वदावे रक्तदान होते. यावेळी त्यांनी ईतरांनाही रक्तदान करण्याचा संदेश दिला.