शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

रक्तदान व वृक्षोरापण कार्यक्रमातून रविवारी बाबूजींना आदरांजली

By admin | Updated: July 1, 2017 00:37 IST

स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकम वृत्तपत्र समूहाचे संस्थापक-संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त ...

लोकमत-आयएमएचा उपक्रम : डॉक्टर्स डे अंतर्गत सामूहिक आयोजनलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकम वृत्तपत्र समूहाचे संस्थापक-संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त रविवार दि. २ जुलैला चंद्रपुरात रक्तदान शिबिरासह वृक्षारोपण या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.लोकमत जिल्हा कार्यालय आणि इंंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमात शहरातील अध्ययन भारती, युवा शक्ती संघटना, पर्यावरण संवर्धन व विकास समिती, बेटी बचाव बेटी पढाओ अभियान व नटराज डॉन्स ग्रूप अकादमीसह अनेक सामाजिक व शैक्षणिक संस्थाही सहभागी होत आहेत. २ जुलैला सकाळी ८ वाजता बायपास मार्गावरील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसर व प्लास्टिक रिसायकलींग फॅक्टरी परिसरात वृक्षारोपणाने या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. यानंतर स्थानिक सरदार पटेल महाविद्यालयाजवळील आयएमए सभागृहात सकाळी १० वाजता या रक्तदान शिबिराला सुरूवात होणार आहे. स्व. बाबूजींच्या प्रतिमेपुढे पुष्पाजंली अर्पण करून रक्तदान शिबिराला सुरूवात होईल. शिबिरासाठी वेळेवरही उपस्थित राहून रक्तदान करता येणार आहे. त्यासाठी नावनोंदणी करण्याची गरज नाही. डॉ. बी. सी. रॉय यांच्या स्मृतिनिमित्त देशभरात १ जुलै हा डॉक्टर डे म्हणून पाळला जातो. तर, १ जुलै ते ७ जुलै हा डॉक्टर्स विक म्हणून पाळला जातो. स्व. बाबूजींच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून आयएमएच्या सहकार्यातून हा रक्तदान शिबिराचा उपक्रम सामाजिक उपक्रम व्हावा, यासाठी आयएमए पदाधिकारी व सामाजिक संस्था या शिबिरासाठी सरसावल्या आहेत. या शिबिरामध्ये रक्तदान करून रक्तदात्यांनी या सामाजिक उपक्रमात मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, अशी विनंती आयएमएचे अध्यक्ष डॉ. विजय करमरकर, सचिव डॉ. मनीष मुंदडा, आणि चंद्रपूर लोकमत जिल्हा कार्यालयाच्यावतीने करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी अमोल कडुकर ९२७०१३१५८०, पूजा ठाकरे ९०११३२२६७४ या क्रमांकावर संपर्क साधावा.रक्तदात्यांना मिळणार प्रमाणपत्र व प्रथमोपचार कीट इंडियन मेडिकल असोशिएशनच्या सहकार्याने होणाऱ्या या रक्तदान शिबिरात रक्तदान करणाऱ्या नागरिकांना ब्लड डोनर कार्ड दिले जाणार आहे. या सोबतच प्रमाणपत्र देऊन गौरवित केले जाणार आहे. तसेच रक्तदात्यांना प्रथमोपचार कीट दिली जाणार आहे. लोकमत सखी मंच, युवा नेक्स्ट सदस्यांना आवाहनबाबूजींच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या या सामाजिक उपक्रमात लोकमत सखी मंच, लोकमत युवा नेक्स्टचे सर्व सदस्य, वृत्तपत्र विक्रेतेबंधंूसह महाविद्यालयीन युवकांनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.