शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

बाबासाहेबांचे कार्य जगासाठी वंदनीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 22:48 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतिदर्शी कार्यामुळे भारतातील शोषितांना सन्मानाने जीवन जगण्याची संधी मिळाली.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : ६१ व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्याचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतिदर्शी कार्यामुळे भारतातील शोषितांना सन्मानाने जीवन जगण्याची संधी मिळाली. बाबासाहेबांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून केलेले ऐतिहासिक कार्य भारतच नव्हे तर जगासाठी वंदनीय आहे, असे प्रतिपादन राज्याचे वने, अर्थ, नियोजन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ६१ व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्याच्या समारोपीय कार्यक्रमासाठी पाठविलेल्या संदेशातून केले आहे.मंचावर केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, आमदार नाना शामकुळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटीचे अध्यक्ष अरुण घोटेकर, अशोक घोटेकर, वामनराव मोडक, अ‍ॅड. राहुल घोटेकर, ज्येष्ठ विचारवंत डॉ. जुल्फी शेख तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. ना. मुनगंटीवार संदेशात पुढे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक न्यायाच्या विचारांची अंमलबजावणी करण्यासाठी मूलगामी धोरण तयार केले. त्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात विशेष तरतूद करून कटाक्षाने अंमलबजावणी केली जात आहे. उपेक्षित समाज घटकांच्या कल्याणासाठी विविध योजना सुरू करण्यात आल्या. समाजातील शेवटच्या व्यक्तीचा विकास साध्य करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्यावतीने अनेक योजना राबविल्या जात आहेत. या निर्णयामागे महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहू महाराजांची प्रेरणा आहे. चंद्रपुरातील दीक्षाभूमीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाहीही ना. मुनगंटीवार यांनी पाठविलेल्या संदेशातून दिली आहे. केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची दीक्षा दिल्याने देशातील कोट्यवधी दलितांची अस्मिता जागृत झाली. गावखेड्यांतील शोषित माणसापर्यंत सामाजिक न्यायाचा विचार पोहोचला. सामाजिक न्यायासाठी आपण कधीही तडजोड करणार नाही, असेही ना. आठवले म्हणाले. कलावंत हेमंत शेंडे व संचाने रात्री प्रबोधनात्मक गीते सादर केली.