शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

बाबासाहेबांच्या अस्थिकलश रॅलीने दुमदुमले शहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 22:42 IST

धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्यानिमित्त स्थानिक गोलबाजारातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाची मिरवणूक सोमवारी सकाळी काढण्यात आली.

ठळक मुद्देसमता सैनिक दलाचे पथसंचलन : जिल्ह्यातून अनुयायी रॅलीत सहभागी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्यानिमित्त स्थानिक गोलबाजारातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाची मिरवणूक सोमवारी सकाळी काढण्यात आली. यावेळी समता सैनिक दलाच्या ५०० सैनिकांनी केलेले पथसंचलन लक्ष वेधून घेत होते.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटीने फुलांची सजविलेल्या रथावर डॉ. आंबेडकर यांचा अस्थिधातू कलश ठेवण्यात आला होता. रथावर भन्ते आर्य नागार्जुन सुरई ससाई, मेमोरिअल सोसायटीचे अध्यक्ष अरूण घोटेकर व भिक्खु संघ आदी स्थानापन्न होते.‘बौद्ध धम्म चिरायू हो’, ‘डॉ. बाबासाहेबांचा जयजयकार हो’, अशा विविध घोषणा देत सकाळी ११ वाजता मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणुकीचे संचालन समता सैनिक दलाचे समता सैनिक करीत होते. त्यांच्या मागे भारतीय बौद्ध महासभेचे उपासक-उपासिका रांगेमध्ये चालत होत्या. या मिरवणुकीत पांढरा गणवेश घातलेले महिला, पुरुष व बालके सहभागी झाले होते. चंद्रपूर शहरातील विविध वस्त्यांमधून स्त्री-पुरुषांचे जत्थे मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ एकत्र आले होते. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने ही मिरवणूक जटपुरा गेट मार्गाने निघाली. पांढºया गणवेशातील मिरवणूक शांततेचा संदेश देत पुढे जात होती. ही मिरवणूक पाहण्याकरिता रस्त्याच्या दुतर्फा लोकांची गर्दी झाली होती. बॅ. राजाभाऊ खोब्रागडे यांच्या पूतळ्याला मालार्पण करून जटपुरा गेट, पाण्याची टाकीमार्गे मिरवणूक दीक्षाभूमी येथे पोहोचली. मिरवणुकीत समता सैनिक दलाचे ५०० सैनिक सहभागी झाले होते. तेथे भव्य स्वागत करण्यात आले. ही मिरवणकू दीक्षाभूमीवर आल्यावर भदन्त आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या हस्ते बाबासाहेबांचा अस्थिकलश बुध्द विहारात जनतेच्या दर्शनार्थ ठेवण्यात आला. त्यानंतर समता सैनिक दलाच्या विद्यार्थ्यांनी भदन्त सुरेई ससाई यांना मानवंदना दिली व बाबासाहेबांच्या चळवळीप्रति कटीबध्द राहण्याची शपथ घेतली.दीक्षाभूमीवर संस्थेचे अध्यक्ष अरुण घोटेकर, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पवित्र दीक्षाभूमीवर लाखोच्या संख्येत भीमसागर उसळला होता.अनेकांनी घेतले अस्थिकलशाचे दर्शनदीक्षाभूमी येथील बुद्ध विहारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अस्थीकलश दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. दीक्षाभूमीवर आलेल्या जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहरील पाहुण्यांनी सर्वप्रथम विहारात ठेवलेल्या बाबासाहेबांच्या अस्थीचे दर्शन घेतले.