शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
3
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
4
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
5
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
6
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
7
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
8
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
9
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
10
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
11
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
12
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
13
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
14
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
15
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
16
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
17
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
18
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
19
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
20
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!

ग्रामसभासंदर्भात जनजागृती करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:29 IST

फुटपाथवर वाहन आडवे; पादचारी त्रस्त चंद्रपूर : महानगरपालिकेने पादचाºयांना चालण्यासाठी रस्त्याच्या बाजुला फुटपाथ तयार केले आहे. मात्र अनेक ठिकाणी ...

फुटपाथवर वाहन आडवे; पादचारी त्रस्त

चंद्रपूर : महानगरपालिकेने पादचाºयांना चालण्यासाठी रस्त्याच्या बाजुला फुटपाथ तयार केले आहे. मात्र अनेक ठिकाणी या फुटपाथवर व्यावसायिकांनी व वाहनधारकांनी अतिक्रमण करून ठेवले आहे. कस्तुरबा मार्गावरील ज्युबिली हॉयस्कूलच्या जवळ असलेल्या दुसºया बाजुच्या फुटपाथवर नेहमीच वाहन आडवे लावून ठेवले जाते. यामुळे पादचाºयांना फुटपाथवरून जाताना रस्त्यावर येऊन परत फुटपाथवर चढावे लागते. विशेष म्हणजे, जिथे वाहन आडवे असते, तिथेच विजेची डिपी आहे.

गंज वॉर्डातून जड वाहतुक बंद करावी

चंद्रपूर : गंजवार्डमध्ये भाजी तसेच धान्य बाजार आहे. गंजवॉर्डामध्ये सरदार पटेल कॉलेज, खासगी दवाखाने, बँकासुद्धा आहेत. याच परिसरातील सीटी हायस्कूल, हिंदी सिटी हायस्कूल, ज्युबिली हायस्कूल, काही मंगल कार्यालयेही आहेत. त्यामुळे व्यापाºयांनी जड वाहने रस्त्यावर ठेवू नये. पोलिसांनी या वाहतुकीवर प्रतिबंध घालण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

अपघातग्रस्तस्थळांवर फलक लावा

चंद्रपूर: शहरातील प्रवण स्थळांवर फलक नसल्याने अपघाताचा धोका आहे. या स्थळांवर फलक लावण्याची मागणी होत आहे. मनपा तसेच बांधकाम विभागाने त्वरित लक्ष देऊन फलके लावावी. काही स्थळांवरील फलक नागरिकांनी चोरून नेले. त्यामुळे नागरिकांची दिशाभूल होत आहे.

ग्रामीण मार्गावर अवैध वाहतूक

चंद्रपूर : जिल्ह्यातील ग्रामीण मार्गावर अवैध वाहतुकीला ऊत आला. मात्र, पोलीस व परिवहन विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. अवधै प्रवासी वाहतुकीमुळे अपघाताच्या घटना घडत असून यात काहींना जीव गमवावा लागला. त्यामुळे अवैध प्रवासी वाहतूृकदारांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

जनावरांसाठी लसीकरण मोहीम सुरू करा

जिवती :तालुक्यातील बहुतांश नागरिक शेती करतात. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांजवळ पाळीव जनावरे आहेत. त्यांना विविध प्रकारचे रोग होऊ नये, यासाठी लसीकरण मोहीम सुरू करावी़ ग्रामपंचायतींना या उपक्रम सहभागी करावे, अशी मागणी तालुक्यातील पशुपालक शेतकऱ्यांनी केली आहे़

शासकीय कार्यालयात स्वच्छतेचा अभाव

वरोरा: तालुक्यातील अनेक शासकीय कार्यालयात स्वच्छतेचा अभाव आहे. कामानिमित्त जाणाऱ्या नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. याचा परिणाम नागरिक व कर्मचाऱ्यांवरही होत आहे. त्यामुळे याकडे लक्ष देवून सासकीय कार्यालयातील शौचालय सामान्य नागरिकांसाठी सुुर करण्याची मगणी करण्यात आली आहे.

वेगवान वाहनांमुळे अपघाताची शक्यता

चंद्रपूर : येथील पडोली परिसरात बांधकाम साहित्याची वाहतूक करणारे अनेक ट्रक ये-जा करतात. धोकादायक व वर्दळीच्या वळणावरही वाहन चालक वाहनाचा वेग कमी करत नाहीत़ त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. ट्रकचालकांच्या मनमानी वेगावर वाहतूक पोलिसांनी नियंत्रण आणण्याची मागणी केली जात आहे.

कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी

चंद्रपूर : जिल्ह्यातील अनेक सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजना व कृषिपंपाना विद्युत पुरवठा करावा लागतो. परंतु अनेक गावांत लाईनमन नसल्याने आणि वीज पुरवठा खंडित झाल्यास परिणाम पडत आहे. त्यामुळे महावितरण कंपनीने कर्मचाºयांची नियुक्ती करून गाव तिथे लाईनमन द्यावा, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.