शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील नियमित कर्जदार अनुदानाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2020 05:00 IST

नियमित कर्जदारांना देखील कर्जमाफी करू अशा प्रकारची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. परंतु अद्याप काहीच निर्णय झाला नसल्याने आशेवर झुलवत ठेवले आहे.  आहे. त्यामुळे त्यांच्या पदरी निराशा आली आहे.  वेळप्रसंगी सावकारांचे कर्ज काढून काही शेतकऱ्यांनी नियमितपणे कर्ज भरले आहे. शासनाच्या चुकीच्या धोरणाचा फटका  शेतकऱ्यांना बसत आहे. थकबाकीदार शेतकऱ्यांना न्याय मिळतो मग प्रामाणिक असणाऱ्या नियमित कर्जदारांना का लाभ  का नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया वंचित कर्जदार व्यक्त करीत आहेत. 

ठळक मुद्देशेतकऱ्यांचे शासन निर्णयाकडे डोळे, रब्बी हंगामाला पैसे नाही

  लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर :  महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजना सुरू होऊन सहा महिने झाले. मात्र या कर्जमाफीची पूर्ण प्रक्रिया पार पडलेली नाही. या कर्जमाफीत थकबाकीदारांना न्याय देण्याची भूमिका घेतली आहे. परंतु, नियमित कर्ज भरणारे सभासद कर्जमाफीच्या आशेवर झुलत आहेत.  शासनाने नियमित कर्जदारांसाठी प्रोत्साहनपर कर्जमाफी करून शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी होत आहे.  नियमित कर्जदारांना देखील कर्जमाफी करू अशा प्रकारची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. परंतु अद्याप काहीच निर्णय झाला नसल्याने आशेवर झुलवत ठेवले आहे.  आहे. त्यामुळे त्यांच्या पदरी निराशा आली आहे.  वेळप्रसंगी सावकारांचे कर्ज काढून काही शेतकऱ्यांनी नियमितपणे कर्ज भरले आहे. शासनाच्या चुकीच्या धोरणाचा फटका  शेतकऱ्यांना बसत आहे. थकबाकीदार शेतकऱ्यांना न्याय मिळतो मग प्रामाणिक असणाऱ्या नियमित कर्जदारांना का लाभ  का नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया वंचित कर्जदार व्यक्त करीत आहेत. कर्जमाफीपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांची देखील परिस्थिती फार चांगली  नाही. परंतु या शेतकऱ्यांची मानसिकता सकारात्मक असल्याने कोणतेही अडचण आली तरी त्यांनी आपल्या कर्जाचा भरणा वेळेत केला आहे. तसेच डॉ.पंजाबराव देशमुख पीक प्रोत्साहन योजनेचा लाभ घेण्यासाठी काही शेतकऱ्यांनी वेळेत कर्जाची परतफेड केली आहे. परंतु शासनाने नियमित कर्जदारांसाठीची घोषणा अंमलात आणली नाही तर नियमित कर्जदारांची ही संख्या भविष्यात घटणार आहे. वेळेत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना २००८ च्या कर्जमाफीत २० हजार अथवा कर्जाच्या २५ टक्के प्रमाणात कर्जमाफी मिळाली होती. याखेपेस मात्र योजनेची घोषणा होऊनही सरकारने शेतकऱ्यांना लाभ दिलेला नाही, अशा तक्रारी आहेत.

शासनाने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी केली. यामध्येही जे शेतकरी नियमित बँकेचे,सहकारी संस्थाचे कर्ज नियमित भरले त्याच्यासाठी प्रोत्साहन देण्याची घोषणा शासनाने केली. मात्र दिवाळी येऊनही शेतकऱ्यांना ही रक्कम मिळाली नाही. या हंगामात सोयाबीन, धान व कापुस उत्पादन रोगामुळे कमी येत आहे. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होण्यास भर पडणार आहे.- प्रशांत कोल्हे, प्रगत शेतकरी,  वाहांनगाव,ता चिमूर

 

टॅग्स :Crop Loanपीक कर्जFarmerशेतकरी