लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत भरमसाठ वाढ केली आहे. याविरोधात रिपब्लिकन स्टुडंट फेडरेशनच्या वतीने अभिनव आंदोलन करण्यात आले. यावेळी वाहनांची शवयात्रा काढून केंद्र सरकारच्या दरवाढीचा निषेध करण्यात आला.केंद्र शासनाने इंधनाची खरेदी मूल्याच्या दुप्पटीने पेट्रोल व डिझेलची भाववाढ केली आहे. यामुळे जनसामान्यांचे कंबरडेच मोडले आहे. यामुळे महागाईवरही याचा मोठा परिणाम होत आहे. प्रवासी वाहतूक, जीवनावश्यक वस्तू यामध्ये आता मोठ्या प्रमाणात वाढ व्हायला लागली आहे. याचा नाहक भार सामान्य जनतेवर पडताना दिसत आहे. यामुळे जनतेत रोष आहे. ही दरवाढ त्वरित कमी करणे गरजेचे आहे. अन्यथा सामान्य नागरिकांचे बेहाल होणार आहेत. याविरोधात रिपब्लिकन स्टुडंट फेडरेशनच्या वतीने प्रतीक डोर्लिकर, राजस खोबरागडे, संदीप देव, सुलभ खोबरागडे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. वाहनांची शवयात्रा काढून या दरवाढीचा विरोध करण्यात आला. आंदोलनाची सांगता कस्तुरबा मार्गावरील कोतपल्लीवार पेट्रोलपंपसमोर करण्यात आली.यावेळी संघपाल सकाटे, नीलेश तितरे, सुरभी मोडक, सविता गावंडे, हर्षल खोबरागडे, सुकेशनी बेंडले, सक्षम पार्थडे, प्रतीक मेश्राम, वृषाली मासरकर यांच्यासह रिपब्लिकन फेडरेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते.
दुचाकीची शवयात्रा काढून निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 22:34 IST
केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत भरमसाठ वाढ केली आहे. याविरोधात रिपब्लिकन स्टुडंट फेडरेशनच्या वतीने अभिनव आंदोलन करण्यात आले. यावेळी वाहनांची शवयात्रा काढून केंद्र सरकारच्या दरवाढीचा निषेध करण्यात आला.
दुचाकीची शवयात्रा काढून निषेध
ठळक मुद्देरिपब्लिकन स्टुडंट फेडरेशनचे अनोखे आंदोलन : इंधन दरवाढीचा विरोध