शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
3
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
4
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
5
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
6
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
7
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
8
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
9
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
10
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
11
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
12
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
13
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
14
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
15
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
16
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
17
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
18
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
19
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला

२२ पैकी १६ तेंदू घटकांचा लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 22:12 IST

मध्य चांदा वन विभागातील तेंदूपाने घटक २२ पैकी १६ घटकांचा लिलाव झाला असून उर्वरित सहा घटकांना कंत्राटदाराने खरेदी न केल्यामुळे ते जैसे थे आहे. विक्री झालेल्या १६ घटकांतून २२ हजार २० प्रमाणित गोणी तेंदूपाने गोरगरीब आदिवासी व इतर स्थानिक लोकांमार्फत गोळा केले जाणार आहे.

ठळक मुद्देमजुरांना दिलासा : मजुरांना पाच कोटी तर शासनाला चार कोटी मिळणार

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : मध्य चांदा वन विभागातील तेंदूपाने घटक २२ पैकी १६ घटकांचा लिलाव झाला असून उर्वरित सहा घटकांना कंत्राटदाराने खरेदी न केल्यामुळे ते जैसे थे आहे. विक्री झालेल्या १६ घटकांतून २२ हजार २० प्रमाणित गोणी तेंदूपाने गोरगरीब आदिवासी व इतर स्थानिक लोकांमार्फत गोळा केले जाणार आहे. त्यापोटी मजुरांना जवळपास पाच कोटी रुपये मिळणार आहे. शासनालाही यातून चार कोटींची रायल्टी प्राप्त होणार आहे.तेंदूपाने घटक हंगाम दरवर्षी मे महिन्यात येतो. कंत्राटदार घटक खरेदी करून मे महिन्यात पाने गोळा करण्याचे कार्य करतात. यावर्षी शासनाने प्रति प्रमाणित गोणी म्हणजे एक हजार पुडे गोळा करण्याचा १८४५ रु. प्रमाणे दर निश्चित केला आहे. त्यामुळे कंत्राटदाराकडून गोरगरीब मजुरांना मजुरीपोटी सुमारे पाच कोटी रुपये नगदी स्वरुपात मिळणार आहे. तसेच विक्री रकमेतून शासनाकडून मजुरांना ८० टक्के रक्कम बोनसद्वारे मिळणार आहे.तेंदूपाने संकलनाचा सर्व व्यवहार वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या देखरेखीत होतो. तेंदूपाने हे नैसर्गिक उपज असल्यामुळे व वन विभागाला कोणताही खर्च करावा लागत नसल्याने शासन गोरगरीब मजुरांच्या हिताचा निर्णय घेवून सुमारे ८० टक्के रक्कम गोळा करणाºया मजुरांच्या बँक खात्यात दिवाळीची भेट म्हणून जमा करतात. एकंदरीत गोरगरीब मजुरांना १५ दिवसांच्या हंगामात हजारो रुपये कमाईचे हे साधन असल्यामुळे याची मजुरांना आतुरतेने प्रतीक्षा असते.यंदा पोंभूर्णा, कोठारी, गोंडपिपरी, बल्लारशाह, पळसगाव, देवाडा या सहा घटकांचा लिलाव न झाल्यामुळे तेथील गोरगरीब जनतेला रिकाम्या हाताने बसावे लागले आहे. त्यामुळे तेथील मजूरवर्गांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्याचे आर्थिक नियोजन विस्कळीत झाले आहे. तसेच पेसा कायद्याअंतर्गत या वन विभागातील लक्कडकोट, अंतरगाव, कन्हारगाव, लाम्बोरी येथील तेंदूपाने ग्रामपंचायतीला मिळत असून त्यापासून गावाच्या विकास कामासाठी खर्च केला जातो.असे चालते कामतेंदू हंगाम हा दरवर्षी ठरल्यावेळेस सुरू होते. या हंगामासाठी गोरगरीब जनता आतूरतेने वाट पाहत असतात. कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती तेंदूपाने गोळा करण्यासाठी हातभार लावतात. पहाटे ४ वाजता उठून जंगलात जावून सकाळी १० वाजेपर्यंत पाने गोळा करतात. त्यानंतर घरी येवून ७० पानांचे पुडे तयार करतात व सायंकाळी कंत्राटदाराच्या निर्धारित संकलन केंद्रावर पोहचता करतात. त्यानंतर कंत्राटदार नगदी रक्कम मजुरांना देतो.