शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मुनगंटीवारांची कल्पकता पाहून उपस्थित भारावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 06:00 IST

चंद्रपूरचे सैनिक स्कूल म्हटले की आपसुकच माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा चेहरा समोर येतो. त्यांनी पूर्णत्वास आणलेला हा महत्त्वपूर्ण प्रकल्प मानला जातो. मात्र शिक्षण विभागाने सदर कार्यक्रमाचे आयोजन व त्याची पत्रिका तयार करताना माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाचा उल्लेख इतर मान्यवरांच्या नावानंतर करण्यात आला.

ठळक मुद्देसैनिक स्कूलमध्ये झालेल्या इन्स्पायर अवॉर्ड जिल्हा प्रदर्शनातील प्रसंग

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ११० एकरात विस्तारलेले चंद्रपूरचे सैनिक स्कूल, तेथील प्रत्येक वास्तूची भव्यता, विविध आकर्षक दालने पाहून जिल्ह्यातील शिक्षकवृंद चांगलेच भारावले. माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पाहिलेले स्वप्न आणि त्याला मूर्तरुप म्हणून उदयास आलेले चंद्रपूरचे सैनिक स्कूल देशातील इतर सैनिक स्कूलपेक्षा सरस आणि सुंदर आहे, याची प्रचिती सर्वांनाच आली. मात्र याच सैनिक स्कूलमध्ये होणाऱ्या शिक्षण विभागाच्या दिमाखदार सोहळ्यात या वास्तूच्या शिल्पकाराचीच गैरहजेरी उपस्थित सर्वांनाच चटका लावून गेली.येथील जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने इन्स्पायर अवॉर्ड योजना २०१९-२० अंतर्गत नववे जिल्हास्तरीय प्रदर्शन २०, २१ व २२ जानेवारी या कालावधीत येथील सैनिक स्कूलमध्ये आयोजित करण्यात आले होते. चंद्रपूरचे सैनिक स्कूल म्हटले की आपसुकच माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा चेहरा समोर येतो. त्यांनी पूर्णत्वास आणलेला हा महत्त्वपूर्ण प्रकल्प मानला जातो. मात्र शिक्षण विभागाने सदर कार्यक्रमाचे आयोजन व त्याची पत्रिका तयार करताना माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाचा उल्लेख इतर मान्यवरांच्या नावानंतर करण्यात आला. येथील सैनिक स्कूलमध्ये सर्वसामान्यांना प्रवेश नसतो. मात्र या प्रदर्शनाच्या निमित्ताने तीन दिवस सर्वांनाच या शाळेत प्रवेश देण्यात आला. जिल्हाभरातील शिक्षक या सोहळ्याला आले होते. मात्र सोहळ्यापेक्षा सर्व शिक्षक सैनिक स्कूलचे भव्यता पाहण्यातच मग्न झाले. तेथील एकेका वास्तूची आकर्षक बांधणी पाहून सर्व शिक्षक भारावले. माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांची कल्पकता सर्वांनाच थक्क करून गेली. विशेष म्हणजे, या सोहळ्याला माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार आले नाही. त्यांच्याच कल्पकतेने साकारलेल्या सैनिक स्कूलमधील सोहळ्यात त्यांची अनुपस्थिती होती, ही खंत उपस्थित अनेक शिक्षकवृंदांनी बोलून दाखविली.भाषणातून व्यक्त झाली खंतइन्स्पायर अवार्डच्या समारोपीय कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. माजी वित्तमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सैनिक स्कूलचे स्वप्न पाहिले. केवळ स्वप्नच पाहिले नाही तर अवघ्या पाच वर्षात ते देशात पहिल्या क्रमांकाचे ठरावे, असे साकारूनही दाखविले. यासाठी मुनगंटीवारांनी दाखविलेली गंभीरता आणि केंद्र सरकारकडे सतत केलेला पाठपुरावा आपण स्वत: बघितला आहे, असेही या मान्यवराने भाषणात बोलून दाखविले. या भव्य वास्तूचा शिल्पकारच या सोहळ्यापासून अशा पद्धतीने दूर व्हावा, ही अतिशय गंभीर बाब असून हे आपल्याला आवडलेले नाही, असेही सदर मान्यवराने आपल्या भाषणातून स्पष्ट सांगून टाकले.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार