शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

परिचर चालवितो आरोग्य उपकेंद्र

By admin | Updated: January 13, 2015 22:57 IST

सावली तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या अधिनस्त असलेल्या अंतरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येत असलेले विहीरगाव येथील उपकेंद्र एका परिचराच्या भरोशावर चालविले जात आहे.

गेवरा : सावली तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या अधिनस्त असलेल्या अंतरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येत असलेले विहीरगाव येथील उपकेंद्र एका परिचराच्या भरोशावर चालविले जात आहे. त्यामुळे येथे रुग्णसेवेचा फज्जा उडाला आहे. शासनाची आरोग्य सेवा उपलब्ध नसल्याने या परिसरातील नागरिकांना पैसे खर्च करून खासगी वैद्यकीय सेवा घ्यावी लागत आहे. विहीरगाव उपकेंद्रात केवळ एक डॉक्टर आहे. या एकाच डॉक्टरवर तालुका आरोग्य अधिकारी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत पाचही उपकेंद्रासह अंतरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. परिणामी विहीरगाव येथील उपकेंद्र वाऱ्यावर सोडुन उंटावरून शेळ्या हाकण्याची प्रकार आरोग्य विभाग करित आहे. याचा परिणाम परिसरातील रुग्णांना भोगावा लागत आहे. शासकीय आरोग्य सेवेचा बोजवारा उडाल्याने परिसरात खासगी वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरांचे फावत आहे. शासनाच्या सार्वजनिक आरोग्य कंद्राच्या मापदंड व निकषाप्रमाणे विहीरगाव उपकेंद्रात मोडणाऱ्या एकूण तीन गावातील ४० हजार लोकसंख्येसाठी एक उपकेंद्र व त्यामध्ये एक डॉक्टर नियुक्ती करण्यात आली. परंतु परिसरातील लोकसंख्येचा तुलनेत प्रभावी व गुणवत्तापुर्ण आरोग्यसेवा मिळणे, अपेक्षित असताना उपकेंद्रातील परिचर, एक आरोग्य सेविका, कंत्राटी आरोग्य सेविका (एन.आर.एम.एम.), एम.बी.डब्ल्यू. वर्कर, व एक मदतनीस यांच्याच भरवशावर डॉक्टराविना दवाखाना सांभाळण्याची जबाबदारी आली आहे. त्यामुळे येथील रुग्णसेवा विस्कळीत झाली असून नागरिकांना मनस्ताप होत आहे. (वार्ताहर)