लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : समाजातील दुर्बल घटकातील मुलींना शाळेत येण्यास प्रोत्साहन मिळावे, शिक्षणामध्ये सातत्य टिकावे यासाठी इयत्ता पहिली ते चवथीमध्ये शिकणाऱ्या शासकीय, निमशासकी शाळेतील विद्यार्थिंनींना उपस्थिती भत्ता दिली जातो. महागाई वाढत असली तरी भत्ता कमी असल्यामुळे नाराजी आहे. मात्र, यावर्षी अद्यापही शाळाच सुरु झाली नसल्याने शैक्षणिक वर्षात ७५ टक्के उपस्थिती होणार नसल्याने उपस्थिती भत्त्यापासून विद्यार्थिंनी वंचित राहणार आहे.मुली शिक्षणापासून वंचित राहू नये, त्यांची पटसंख्या वाढावी तसेच शाळेतील विद्यार्थिंनींची संख्या टिकून राहावी यासाठी राज्य शासनाने १९९२ ला ही योजना सुरु केली. योजनेनुसार संबंधित विद्यार्थिंनींना शैक्षणिक वर्षामध्ये किंमान ७५ टक्के उपस्थिती राहणे गरजेचे आहे. या योजनेमुळे ग्रामीण भागातील मुलींचे शाळेत येण्याचे प्रमाण बरेच वाढले. मात्र यावर्षी सप्टेंबर महिना संपत असतानाही शाळा सुरू झाल्या नाही. त्यामुळे भविष्यात शाळा सुरु झाली तरीही शासन नियमाप्रमाणे ७५ टक्के उपस्थिती होणार नसल्याने विद्यार्थिंनी या भत्ताला मुकावे लागणार आहे. त्यामुळे शासनाने यामध्ये बदल करणे गरजेचे आहे.भत्ता वाढविण्याची मागणी२८ वर्षापूर्वी शासनाने ही योजना सुरु केली. त्यावेळी एका दिवसासाठी एक रुपया उपस्थिती भत्ता दिल्या जात होता. आता सर्वत्र महागाई वाढली आहे. त्यामुळे आजच्या काळात एका रुपयात काहीच होत नसल्याने या भत्त्यामध्ये वाढ करण्याची मागणी शिक्षकांसह सामाजिक संघटनांनी ही केली आहे.या योजनेंतर्गंत विद्यार्थिंनींना शैक्षणिक वर्षात ७५ टक्के उपस्थिती राहणे अनिवार्य आहे. मात्र कोरोनामुळे यावर्षी शाळा अद्यापही सुरु झाल्या नसल्याने भत्तापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. शासनाने योजनेचे स्वरुप बदलवून आणि भत्त्यामध्ये वाढ करून देणे गरजेचे आहे.-जे.डी. पोटेशिक्षण समिती सदस्य, जि.प.चंद्रपूर
उपस्थिती भत्त्याला विद्यार्थिंनी मुकणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 15:05 IST
Chandrapur news, school, girl, student यावर्षी अद्यापही शाळाच सुरु झाली नसल्याने शैक्षणिक वर्षात ७५ टक्के उपस्थिती होणार नसल्याने उपस्थिती भत्त्यापासून विद्यार्थिंनी वंचित राहणार आहे.
उपस्थिती भत्त्याला विद्यार्थिंनी मुकणार
ठळक मुद्देशाळा सुरु न झाल्याने संभ्रम७५ टक्के उपस्थिती अनिवार्य