शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसांत २० पर्यटकांची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2021 05:00 IST

कारवा सफारीची माहिती देताना वन परीक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांनी सांगितले की बल्लारपूरपासून कारवा वनपरीक्षेत्र अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर आहे. तर चंद्रपूरपासून १९ किमी अंतरावर आहे. मध्य चांदा  वन विभागात कारवा हे आदिवासीबहुल गाव आहे. जंगलाच्या कुशीत सामावलेले आहे. या वनक्षेत्रात वाघ, बिबट, रानगवे, अस्वल, रानमांजर, हरीण चितळ, सांबर, नीलगाय, चौसिंगा, रानकुत्रे या सोबतच २०० पक्षी व फुलपाखरे बघण्याचा आनंद सफारी करणाऱ्यांना लुटता येणार आहे.

मंगल जीवनेलोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये बंद झालेले कारवा येथील देशातील पहिले सफारी पर्यटन ८ महिन्यानंतर पुन्हा २५ डिसेंबरपासून सुरू झाले आहे. दोन दिवसांत २० पर्यटकांनी हजेरी लावली आहे. पहिल्याच दिवशी वाघाने दर्शन दिल्यामुळे पर्यटक जाम खूश आहे. संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून बल्लारशाह वन परिक्षेत्रातील सफारी करण्यासाठी जनताही उत्सुक आहे. कारवा सफारीची माहिती देताना वन परीक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांनी सांगितले की बल्लारपूरपासून कारवा वनपरीक्षेत्र अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर आहे. तर चंद्रपूरपासून १९ किमी अंतरावर आहे. मध्य चांदा  वन विभागात कारवा हे आदिवासीबहुल गाव आहे. जंगलाच्या कुशीत सामावलेले आहे. या वनक्षेत्रात वाघ, बिबट, रानगवे, अस्वल, रानमांजर, हरीण चितळ, सांबर, नीलगाय, चौसिंगा, रानकुत्रे या सोबतच २०० पक्षी व फुलपाखरे बघण्याचा आनंद सफारी करणाऱ्यांना लुटता येणार आहे. विशेष म्हणजे पहिल्याच दिवशी न्यायधीश अजय भटेवरा यांनी वाघाचे दृश्य टिपले. यामुळे पर्यटकांची उत्सुकता वाढली आहे.याशिवाय ५० किमीचे जुने बैलगाडी आणि कूप रस्त्याचा वापर करून पर्यटन रस्ते तयार करण्यात आले. सफारी पर्यटनासाठी अनेक कक्षातील मार्गावर कारवा रोपवाटिकापर्यंत रस्त्याचे जाळे तयार करण्यात आले आहे. तरीही प्रायोगिक तत्त्वावर एसयूव्ही खासगी वाहनांना प्रवेश देण्यात येत आहे. प्रवेश शुल्क व गाईड शुल्क देऊन या सफारीचा आनंद पर्यटकांना लुटता येतो. सफारी पर्यटन क्षेत्रात ई-सर्विसेसचे कॅमेरे बसविले असून  त्याद्वारे पर्यटकांवर सफारी पर्यटनाच्या घडामोडीवर व वन्यजीव हालचालीवर देखरेख व नियंत्रण ठेवण्यास मोलाची मदत होते. सफारीसाठी संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अमोल कवासे यांच्याकडे बुकिंगची व्यवस्था आहे.

सध्या कारवा जंगल वन्यप्राण्यांच्या झुंडीने सर्वदूर प्रसिद्ध आहे. यासाठी मागील अनेक महिन्यांपासून जिल्ह्यातील पर्यटक कारवा सफारी सुरू होण्याची वाट पाहत होते. आता सफारी पर्यटन पुन्हा सुरू झाल्यामुळे पर्यटकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे.  -संतोष थिपे, वन परीक्षेत्र अधिकारी, बल्लारशाह

 

टॅग्स :tourismपर्यटन