त्याला वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता नेले असता प्रकृती गंभीर बनल्याने पुढील उपचारार्थ चंद्रपूर येथील रुग्णालयात दाखल केले आहे. मूळचा भंडारा जिल्ह्यातील असलेला एक व्यक्ती काही वर्षांपासून आनंदवनात वास्तव्यास आहे. सदर व्यक्ती आनंदवनातील महारोगी सेवा समितीच्या कार्यालयात काम करतो. त्याला कोरोनाचे लक्षण दिसल्याने त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे काही दिवसांपासून तो अस्वस्थ होता. बुधवारी सकाळी त्याने आपल्या हाताची नस स्वतः कापली. हे लक्षात येताच आनंदवनच्या रुग्णवाहिकेने त्याला वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता आणले. परंतु, तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याने व रक्तस्त्राव अधिक झाल्याने त्याची प्रकृती गंभीर झाली. त्यामुळे त्याला पुढील उपचारार्थ चंद्रपूर येथे पाठविण्यात आले. त्याला आनंदवनातील विलगीकरण कक्षात ठेवण्याच्या हालचाली सुरू असतानाच त्याने हा प्रकार केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
आनंदवनातील कोविड रुग्णाचा आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:54 IST