शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

सुनेवर अत्याचाराचा प्रयत्न; जाब विचारायला आलेल्या चुलतीची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2023 21:57 IST

Chandrapur News माझ्या सुनेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न का केला, असा जाब विचारण्यासाठी आलेल्या माेठ्या आईचीच चुलत पुतण्याने दगडाने ठेचून हत्या केली. तो इतक्यावरच थांबला नाही तर हत्येचा पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह शेणाच्या खड्ड्यात नेऊन टाकला.

चंद्रपूर: माझ्या सुनेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न का केला, असा जाब विचारण्यासाठी आलेल्या चुलतीचीच चुलत पुतण्याने दगडाने ठेचून हत्या केली. तो इतक्यावरच थांबला नाही तर हत्येचा पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह शेणाच्या खड्ड्यात नेऊन टाकला. ही थरारक घटना सोमवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास पोंभुर्णा तालुक्यातील सोनापूर येथे घटना घडली. पुष्पा मधुकर ठेंगणे (६२) रा. सोनापूर असे मृतकाचे नाव आहे. तर धीरज रवींद्र ठेंगणे (२०) रा. सोनापूर असे आरोपीचे नाव असून तो फरार आहे.

पोलिस सूत्रानुसार, पुष्पा मधुकर ठेंगणे यांची सून शेतातून दुपारी घरी परत येत असताना धीरज ठेंगणे हा त्याच्या गुराच्या गोठ्याजवळ काम करीत होता. ओझे उचलण्याच्या बहाण्याने धीरज याने तिला बोलाविले. यामागे त्याचा वेगळाच हेतू होता. ती त्याच्या मदतीला जाताच त्याने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र ती त्याच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घरी परतली. तिने ही सर्व आपबिती आपल्या सासूला सांगितली. सासू पुष्पा ठेंगणे यांचा पारा चढला. यानंतर त्या जाब विचारण्यासाठी धीरजकडे गेल्या असता धीरज याने तिच्याशी वाद घालत तिची दगडाने ठेचून हत्या केली. यानंतर हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह ओढत नेऊन बाजूच्या शेणखताच्या खड्ड्यात फेकला आणि तो तिथून पसार झाला. आई घरी परत न आल्याने पुष्पा ठेंगणे यांचा मुलगा शोधत गेला असता त्याला शेणखड्ड्यात रक्तबंबाळ अवस्थेत ती दिसली. ती मृतावस्थेत असल्याने घटनेची माहिती पोंभूर्णा पोलिसांना दिली. पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह ग्रामीण रुग्णालय पोंभुर्णा येथे शवविच्छेदनासाठी पाठवला. फरार आरोपींवर भादंवि कलम ३५४, ३०२ नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार मनोज गदादे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी