धरणे आंदोलन : माकपाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : माकर््सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव सिताराम येचूरी यांच्यावर पत्रकार परिषद घेत असतांना काही लोकांनी त्यांच्यावर भ्याड हल्ला केला. या हल्ल्याचा निषेधार्थ माकपा तसेच महाराष्ट्र लोकशक्ती आघाडीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेधार्थ धरणे आंदोलन करण्यात आले. तसेच एका शिष्टमंडळामार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.किशोर पोतनवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या धरणा कार्यक्रमात काँग्रेसचे नंदू नागरकर, माधव गुरनुले, एस.एच.बेग, राजेश पिंजरकर, अंकूश वाघमारे, रामकुमार, प्रदिप बोरघाटे, माधव, गुरनुले, वामन बुटके, नामदेव कन्नाके, संध्या खनके, रमेशचंद्र दहिवडे आदी नागरिक उपस्थित होते. झाले होते. यावेळी धर्मांध शक्तीला आवर घाला, हिंदू मुस्लीम शिख इसाई हम सब्ब भाई भाई, जातपात धर्म का झगडा नही चलेगा, आदी घोषणा देण्यात आल्या.धर्मान्ध शक्तीला वेळेवरच आवर घातला नाही, तर देशाची लोकशाही धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही याच, धर्माधिशक्तीनी डॉ. नरेद्र दाभोंळकर, गोंविद पानसरे, डॉ. एम. एम. कुलबुर्गी या पूरागामी विचारवंताची हत्या केली. तीन वर्ष लोटूनही हत्यारे मोकाट आहेत. त्यामुळे धर्मांध शक्तींना उत आला आहे. त्यातूनच सिताराम येचुरी यांच्यावर हल्ला करण्यात आला. असा आरोप उपस्थितांनी केले. त्यानंतर नामदेव कन्नाके यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांना भेटून आपल्या मागण्यांचे निवेदन सदर केले. वर्षा तिजारे यांच्या आभार प्रदर्शनाने धरणे कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. धरणे आंदोलन यशस्वीतेसाठी नायर, रमन्ना प्रल्हाद वाघमारे वामन मेश्राम, भारत थुल्लर यांनी प्रयत्न केले.
येचुरी यांच्यावरील हल्ल्याचा निषेध
By admin | Updated: June 18, 2017 00:39 IST