शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

श्रीकृष्ण टॉकीज परिसरात महिलेच्या घरावर हल्ला

By admin | Updated: May 25, 2015 01:29 IST

येथील श्रीकृष्ण टॉकीज परिसरातील रहिवासी वीणा पंडित यांच्या घरावर जुन्या वादातून चार ते पाच युवकांनी हल्ला केला.

चंद्रपूर: येथील श्रीकृष्ण टॉकीज परिसरातील रहिवासी वीणा पंडित यांच्या घरावर जुन्या वादातून चार ते पाच युवकांनी हल्ला केला. यावेळी या युवकांच्या टोळक्याने त्यांच्या घराची तोडफोड केली. यासंदर्भात लगेच विणा पंडित यांनी चंद्रपूर शहर पोलिसांशी संपर्क साधून तक्रार केली. मात्र तक्रार करण्याऐवजी तुम्ही आपसात तडजोड करून घ्या, असा उरफाटा सल्ला पोलिसांनी पंडित यांना दिला. या घटनेने पंडित कुटुंबात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी सकाळी ९ ते ९.३० वाजताच्या सुमारास चार-पाच युवकांचा समावेश असलेले युवकांचे एक टोळके विणा पंडित यांच्या घरात शिरले. त्यांनी पंडित यांना शिविगाळ करीत घरातील साहित्याची तोडफोड सुरू केली. या घटनेनंतर हे युवक तेथून पसार झाले. विणा पंडित पोलीस ठाण्यात पोहचल्या. घडलेली हकीगत पोलिसांना सांगितली. आरोपींची नावेदेखील सांगितली. मात्र पोलिसांनी याप्रकरणी कोणतीही कारवाई न करतान पंडित यांना दुपारी २ वाजेपर्यंत पोलीस ठाण्यात बसवून ठवले. एवढेच नव्हे तर तुमचा वैयक्तिक वाद आहे. त्यामुळे तुम्ही आपसात तडजोड करून प्रकरण मिटवा, असा सल्ला तेथे उपस्थित सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी यांनी विणा पंडित यांनी दिला. त्यामुळे हतबल होऊन विणा पंडित घराकडे परत आल्या. त्यानंतर त्यांनी ठाणेदार प्रदीप सिरस्कर यांना दूरध्वनी करून घटनेची माहिती दिली. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत या प्रकरणी पोलिसांनी कोणतेही गुन्हे दाखल केले नव्हते. यासदर्भात शहर पोलिसांशी संपर्क केला असता, प्रकरण चौकशीत ठेवण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. एकूणच या प्रकरणी पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. याप्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याची मागणी पंडित यांनी केली आहे. (प्रतिनिधी)