आरोप : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राष्ट्रीय कीर्तनकार सत्यपाल महाराजांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविण्यात आले. यावेळी सत्यापाल महाजांवर हल्ल्याचा कट उघडकीस आणण्याची मागणी माजी आमदार वामनराव चटप व श्रीगुरुदेव सेवा महिला मंडळाने केली आहे.अकोला जिल्ह्यातील आकोट येथील राष्ट्रसंताच्या विचाराचे जेष्ठ प्रचारक सत्यपाल चिंचोळकर (सत्यपाल महाराज) १२ मे रोजी नायगाव (मुंबई) येथे बुद्ध जयंती उत्सव मंडळात राष्ट्रसंताचे विचार, ग्रामगीता, गाडगेबाबा, शाहु, फुले, आंबेडकर, सावित्रीबाई फुले, जिजामाता, राष्ट्रीय एकात्मता, शेतकऱ्यांची आत्महत्या, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा या विषयावर किर्तन करीत होते. प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर करीत असताना कुणाल जाधव या युवकाने सत्यपाल महाराजांच्या पोटावर चाकूने वार करीत जखमी केले. या घटनेचा माजी आमदार वामनराव चटप, श्री गुरुदेव सेवा महिला मंडळ व सर्व गुरुदेवभक्त निषेध केला आहे.या हल्ल्याचा मुख्य सुत्रधार कोण, याची कसून चौकशी करण्यावत ावी, राष्ट्रीय किर्तनकार व समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज, देशभर समाजप्रबोधनात्मक कार्यक्रम करीत असतात. सत्यपाल महाराजांवर झालेला हल्ला हा पानसरे, दाभोळकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रमाणे कट रचण्याचा प्रयत्न होता असेही म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी हा कट उघडकीस आणून कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली.
सत्यपाल महाराजांवर हल्ल्याचा कट
By admin | Updated: May 28, 2017 00:40 IST