शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत वातावरण तापले

By admin | Updated: April 6, 2016 00:43 IST

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक १७ एप्रिलला होऊ घातली आहे.

१७ ला निवडणूक : १८ जागांसाठी ४५ उमेदवार रिंगणात चंद्रपूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक १७ एप्रिलला होऊ घातली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापले असून १८ जागांसाठी ४५ उमेदवार रिंगणात आहेत. १७ एप्रिलला निवडणूक व १८ ला मतमोजणी होऊन निकाल घोषित होणार असल्याने उमेदवारांकडून मतदारांच्या भेटीगाठी सुरू झाल्या आहेत.चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे वार्षिक उत्पन्न दोन कोटींच्या घरात आहे. या बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत ३१ डिसेंबर २०१५ रोजी संपुष्टात आली. त्यानंतर मात्र वर्षभर प्रशासक मंडळाने बाजार समितीचा कारभार सांभाळला. त्यानंतर शासकीय पॅनल बाजार समितीवर बसले. ७ आॅगस्ट २०१५ रोजी मुख्य प्रशासक म्हणून देवराव भोंगळे यांनी कारभार स्वीकारला होता. दरम्यानच्या काळात न्यायालयाने मुदत संपलेल्या बाजार समित्यांच्या निवडणुका घ्याव्यात, असे आदेश सहकार विभागाला दिले होते. त्यानुसार मुदत संपलेल्या बाजार समित्यांचा निवडणुकीचा कार्यक्रम सहकार विभागाने जाहीर केला. अर्ज भरणे, मागे घेण्याची प्रक्रिया पार पडली आहे. उमेदवारांना काही दिवसांपूर्वीच चिन्ह वाटप झाले असल्याने आता प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे.कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळात १८ उमेदवारांचा समावेश असून सेवा सहकारी संस्थेच्या गटातून एकूण १८ उमेदवार रिंगणात आहेत. त्यातून ११ उमेदवारांना निवडून द्यायचे आहेत. ग्रामपंचायत गटात सहा उमेदवार रिंगणात आहेत. त्यातून चार उमेदवारांना निवडून द्यायचे आहेत. व्यापारी - अडते मतदारसंघातून पाच उमेदवार असून, त्यातील दोन, तर हमाल-मापारी गटातून एक उमेदवार निवडून येईल. बाजार समितीवर काँग्रेसचे वर्चस्व राहिले असून सत्तास्थापनेसाठी काँग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)