शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी ‘अटल बांबू समृद्धी’ योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 00:39 IST

पारंपरिक शेतीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे प्रगतीचा नवा मार्ग उपलब्ध व्हावा, यासाठी राज्य सरकारने अटल बांबू समृद्धी योजना राबविण्याचा निर्णय घेतला.

ठळक मुद्देबांबू शेतीला मिळणार प्रोत्साहन : सरकारकडून टिश्यू कल्चरचा पुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पारंपरिक शेतीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे प्रगतीचा नवा मार्ग उपलब्ध व्हावा, यासाठी राज्य सरकारने अटल बांबू समृद्धी योजना राबविण्याचा निर्णय घेतला. योजनेच्या माध्यमातून सरकारकडून शेतकºयांना बांबू टिश्यू कल्चरसाठी ५० ते ८० टक्क्यांपर्यंत अनुदान तसेच दर्जेदार टिश्यू कल्चरचा पुरवठा केला जाणार आहे.जिल्ह्यातील हवामान बांबू लागवडीसाठी पोषक आहे. शेती व शेतकरी मानवनिर्मित आणि नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत येऊ लागला आहे. शेतीमालाला मिळणारे अल्पदर, अपुरा वीजपुरवठा, व्यापाºयांची मनमानी आदी विविध कारणामुळे शेतकºयांना शेती करताना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. शेतीतील शाश्वत उत्पन्न कमालीचे घडले आहे. शेती व्यवसायाबाबत शेतकºयांसह नव्या पिढीतही प्रचंड उदासीनता निर्माण होऊ लागली. अनेक शेतकरी शेती करण्यासाठी धजावत नाही. रोजगारासाठी शहराकडे स्थलांतर करण्याच्या मानसिकतेत आहेत. शेतकºयांची मुले शेतीपासून लांब चालली. हंगामी नोकरी निमित्ताने शहरात जात आहेत. यावर राज्य सरकारने पारंपरिक शेतीला पर्याय म्हणून बांबू शेतीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ‘अटल बांबू समृद्धी’ योजना तयार करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून चार हेक्टरपर्यंतच्या शेतकºयांना ८० टक्के अनुदानावर दर्जेदार बांबूचे टिश्यू कल्चर शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. चार हेक्टरच्या पुढील शेतकºयांना ५० टक्के अनुदानावर हे टिश्यू कल्चर उपलब्ध केल्या जाणार असून हेक्टरी ६०० रोपे दिली जाणार आहेत.टिश्यू कल्चरमध्ये व्यावसायिकदृष्ट्या महत्त्व असलेल्या बांबूच्या विविध जातींची लागवड केली जाणार आहे. यामध्ये भारतातील ‘कटांग’ आणि ‘माणगा’ या दोन स्थानिक जातींबरोबरच इतर पाच जातींचा समावेश आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकºयांना महाराष्ट्र बांबू विकास महामंडळाकडे आॅनलाईन किंवा आॅफलाईन अर्ज करता येईल, अशी माहिती वन विभागाने दिली.जिल्ह्यातील हवामान बांबूला पोषकभारतात सुमारे २६ हजार कोटींची बांबूची बाजारपेठ आहे. त्या तुलनेत शेतात बांबूचे उत्पादन अतिशय अल्प आहे. त्यामुळे शेतकºयांनी बांबू शेतीकडे वळण्याची गरज निर्माण झाली. अल्पभूधारक शेतकºयांनी बांधावर बांबू शेती केल्यास आर्थिकदृष्ट्या परवडू शकते. फर्निचर, प्लायवूड, काटेंज, शोभेच्या वस्तू व बांधकाम व्यवसायात बांबूचा उपयोग केला जातो.

टॅग्स :Farmerशेतकरी