शहरं
Join us  
Trending Stories
1
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
2
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
3
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
4
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
5
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
6
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
7
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
8
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
9
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
10
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
11
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
12
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
13
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
14
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
15
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
16
निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले
17
मनसेचा प्लॅन तयार? रिक्त पदांवर तरुणांना संधी देणार
18
अश्लील कंटेंट दाखविणाऱ्या उल्लू, देसिफ्लिक्ससह २५ ॲपवर बंदी
19
समलिंगी मातेच्या जोडीदारालाही ‘पितृत्व रजा’!
20
‘सहकारा’चा मंत्र गावागावांत पोहोचावा म्हणून..राष्ट्रीय सहकार धोरण २०२५, एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य

बापरे ! नागभीड तालुक्यात तब्बल १२ शाळा शिक्षिकेविना ! शिक्षिकेची नियुक्ती करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2024 13:49 IST

कसे होणार समुपदेशन : शिक्षिकांची नियुक्ती न करणे हे चिंताजनक

घनश्याम नवघडे लोकमत न्यूज नेटवर्क नागभीड : शाळेमध्ये एकतरी शिक्षिका असणे आवश्यक आहे. परंतु, नागभीड तालुक्यात तब्बल १२ शाळा शिक्षिकेविना आहेत. यातील काही शाळा उच्च प्राथमिक आहेत. सध्या महाराष्ट्रात मुलींवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले आहेत. अत्याचाराचे हे प्रकार शाळेतही घडत आहेत. यादृष्टीने शासन विविध उपाययोजना करीत आहे. पार्श्वभूमीवर प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळांमध्ये शासनाकडून शिक्षिकांची नियुक्ती न करणे हे खरोखरच चिंताजनक आहे.

मिळालेल्या माहितीनुसार नागभीड पंचायत समितीअंतर्गत एकूण ११० शाळा आहेत. बाकी शाळांमध्ये शिक्षिकेची नियक्ती करण्यात आली असली तरी यातील १२ शाळा अशा आहेत की, या शाळांमध्ये शिक्षिकांची नियुक्तीच करण्यात आली नाही. ज्या शाळांमध्ये शिक्षिकांची नियुक्तीच करण्यात आली नाही, त्यात देवपायली, बाळापूर बुज, चिकमारा, पाहार्णी, पारडी ठवरे, नवेगाव हुंडेश्वरी, पारडी जाटीन, नवानगर, सोनुली (क.), सोनापूर तु, लखमापूर आणि मेंढा चारगाव या शाळांचा समावेश आहे. 

मागील सत्रापर्यंत तर मांगरूड आणि जनकापूर या मोठ्या शाळांमध्ये शिक्षिकेची नियुक्ती नव्हती. या सत्रात या दोन्ही शाळांत शिक्षिकांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती मिळाली. नाही तर शिक्षिकेविना असलेल्या शाळांची संख्या १४ झाली असती. 

बदलीचे धोरण कारणीभूत सन २०१८ पासून ऑनलाइन बदल्यांचे धोरण अंमलात आले आहे. या धोरणात सेवाज्येष्ठतेनुसार शिक्षकांच्या बदल्या करण्यात येतात. त्यामुळे शाळा महिला शिक्षिकेपासून वंचित राहतात. ऑफलाइन बदलीमध्ये अशी चूक झाली तर मागाहून महिला शिक्षिकेची नियुक्ती करण्यात येत होती. ऑनलाइन बदलीमध्ये अशी सोय नाही, अशी कुजबुज शिक्षण वर्तुळात यासंदर्भात ऐकायला मिळाली.

"पाहार्णी गाव मोठे आहे. पहिली ते सातवीचे वर्ग आहेत. पटसंख्या १३८ आहे. मात्र, शाळेत शिक्षिका नाही. शाळेत शिक्षिकेची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी आम्ही केली होती. मात्र, प्रशासनाने दुर्लक्ष केले."- पुरुषोत्तम बगमारे, उपसरपंच, पाहार्णी

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाchandrapur-acचंद्रपूर